कर्जमाफीसाठी नांदेडात अर्थमंत्र्यांची गाडी अडविली

By admin | Published: March 20, 2017 03:13 AM2017-03-20T03:13:12+5:302017-03-20T03:13:12+5:30

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरात रविवारी दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

In the Nanded, the finance minister stopped the loan for waive | कर्जमाफीसाठी नांदेडात अर्थमंत्र्यांची गाडी अडविली

कर्जमाफीसाठी नांदेडात अर्थमंत्र्यांची गाडी अडविली

Next

नांदेड : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरात रविवारी दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनांचा  ताफा अडविला़ पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर हा ताफा पुढे रवाना झाला.
एका कार्यक्रमासाठी मुनगंटीवार हे नांदेडात आले होते़ कार्यक्रमस्थळी जाताना बजाज गॅलेक्सी परिसरात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविला़ जवळपास दहा मिनिटे अर्थमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा या कार्यकर्त्यांनी रोखला होता. ताफ्यातील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले़ त्यानंतर, मुनगंटीवार हे कार्यक्रमस्थळी पोहोचले़  ही स्टंटबाजी प्रसिद्धीसाठी ज्या कोणी दहा-पाच कार्यकर्त्यांनी माझ्या ताफ्यातील पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला, तो केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: In the Nanded, the finance minister stopped the loan for waive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.