गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहीबची मोठी घोषणा, आरोग्य सेवा उभारण्यासाठी दान करणार सर्व सोनं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:54 AM2021-05-25T08:54:08+5:302021-05-25T08:57:52+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. यात अनेकांचा बळी गेला. त्यावेळीही, अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या समोर आल्या आणि त्यांनी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था केली होती. (Gurudwara takht shri hazoor sahib big announcement)
नांदेड- गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहीबने (Gurudwara Takht Shri Hazoor Sahib) जो निर्णय घेतला आहे, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहीबने, गेल्या पाच दशकांत जेवढे सोने जमले आहे, ते सर्व मेडिकल इंफ्रास्ट्रक्चरसाठी दान करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. या सोन्यातून रुग्णालयांपासून ते आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याची पूर्तता केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. यात अनेकांचा बळी गेला. त्यावेळीही, अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या समोर आल्या आणि त्यांनी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था केली होती. (Nanded Gurudwara takht shri hazoor sahib big announcement all gold will be donated to create health services)
23 मेरोजी आणखी एका कोरोना सेंटरचा शुभारंभ -
कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी देशभरातील अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्यांनी खाण्यापासून ते बेड आणि ऑक्सिजनपर्यंतची व्यवस्था केली होती. एक दिवसापूर्वीच शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने रूपनगरमधील गुरुद्वारा श्री भट्ठ साहीबच्या हॉलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. या सेंटरचे लोकार्पण अकाली दल प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख जगीर कौर 23 मेरोजी अरदास करून करतील.
Coronavirus: आनंदाची बातमी! कोरोनावरील औषध आता ८५ रुपयांत खरेदी करा; भारतीय कंपनीची कमाल
दिल्लीतही कोरोना रुग्णांसाठी सुरू आहे लंगर -
यापूर्वी, दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांना म्हटले होते, की लॉकडाउन आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत गुरुद्वारा बंगला साहीबच्या वतीने लंगर सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोना पीडित कुटुंब, जे स्वतः भोजन बनवू शकत नाहीत, खाण्याची व्यवस्थाही करू शकत नाही. त्यांच्या घरापर्यंत लंगरचे टिफीन पोहोचवले जात आहे. यासंदर्भात दिल्ली गुरुद्वारा समितीने हेल्पलाइन नंबरही सुरू केला आहे. ज्या कुटुंबांना आपल्या घरी लंगर हवे आहे, ते या फोन नंबरच्या माध्यमाने दिल्ली गुरुद्वारा समितीशी संपर्क साधू शकतात. समिती त्यांच्या घरापर्यंत लंगर पोहोचवण्याची व्यवस्था करेल.