पेट्रोल खरेदीसाठी नांदेड, मुंबई ‘महाग’
By admin | Published: April 24, 2017 03:56 AM2017-04-24T03:56:15+5:302017-04-24T03:56:15+5:30
राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढवल्याचा सर्वाधिक फटका नांदेड व मुंबईतील वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
मुंबई : राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढवल्याचा सर्वाधिक फटका नांदेड व मुंबईतील वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. कारण नव्या दरानुसार महाराष्ट्रच नव्हे, तर देशात पेट्रोलचे सर्वात जास्त दर हे नांदेडपाठोपाठ मुंबईत आकारले जात आहेत. नांदेडमध्ये ७७ रुपये ९८ पैसे, तर मुंबईत पेट्रोलसाठी लीटरमागे ७७ रुपये ४५ पैसे मोजावे लागत आहेत.
या दरवाढीचा मुंबईतील पेट्रोल पंपचालकांसह वाहनचालकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांचे बजेट कोलमडणार असून पंपचालकांचेही नुकसान होणार आहे. मुळात अवघ्या २१ रुपये ६७ पैशांत कच्चे तेल खरेदी करणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष पेट्रोल स्वरूपात पुरवठा करेपर्यंत इंधनाच्या किमतीत ३५० टक्क्यांनी वाढ करावी लागत आहे. यामध्ये कच्च्या तेलावरील प्रक्रियेपासून वाहतूक शुल्क, सीमा शुल्क, पंप चालकांचे कमिशन, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या कराचाही समावेश आहे. या सर्व प्रक्रियेनंतर राज्य सरकारने गतवर्षी दुष्काळ कर आणि आता अधिभार आकारल्याने मुंबईकरांना देशाच्या तुलनेत सर्वाधिक दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. (प्रतिनिधी)
कच्च्या तेलापासून वाहनाच्या टाकीत येईपर्यंत विविध कर आणि घटकांमुळे पेट्रोलच्या दरात वाढ होते. पेट्रोलच्या या प्रवासाची माहिती...
राज्य सरकारने आकारलेल्या अधिभारामुळे नांदेड शहरात पेट्रोल खरेदीसाठी सर्वाधिक दर आकारले जात असले, तरी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, नागपूर या शहरांतील पेट्रोलचे दरही प्रति लीटर ७७ रुपयांवर गेले आहेत. नव्या दरवाढीनंतर या
शहरांना पेट्रोलसाठी लीटरमागे आकारण्यात येणारे दर खालीप्रमाणे-