वेळेवर रेल्वेगाड्या चालविण्यात नांदेड विभाग चौथ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2016 08:53 PM2016-09-11T20:53:04+5:302016-09-11T20:53:04+5:30
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने वेळेवर रेल्वेगाड्या चालविण्यात(वक्तशिर)आॅगस्ट महिन्यात देशात चौथा क्रमांक प्राप्त करीत इतिहास घडविला
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने वेळेवर रेल्वेगाड्या चालविण्यात(वक्तशिर)आॅगस्ट महिन्यात देशात चौथा क्रमांक प्राप्त करीत इतिहास घडविला. सर्वसाधारणपणे अनेकदा रेल्वेगाड्या उशीराने धावतात. परंतु नांदेड विभागाने त्यावर मात करीत देशात चौथा क्रमांक मिळविला.
नांदेड विभागात साधारणपणे एक हजार किलोमीटर एकेरी मार्ग आहे. यामध्ये १७३ किलोमीटर मार्ग हा मीटर गेज आहे. हा एक हजार किलोमीटर रुळाचा मार्ग साधारणत: महाराष्ट्रातील मराठवाडा,विदर्भ, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यात पसरलेला आहे. या एकेरी मार्गावर प्रवासी व मालवाहू रेल्वेगाड्या वेळेवर चालविणे हे नेहमीच जिकीचे काम ठरते.
यासाठी चांगली योजना,सततची देखरेख आवश्यक असते. कोणत्याही प्रकारची दुर्घटना,एका रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक हे सर्व रेल्वेंच्या वेळापत्रकावर परिणाम क रते. परंतु नांदेड विभागाने देशात चौथे क्रमांक प्राप्त करून या सर्वावर मात केल्याचे दिसते.
आॅगस्टमध्ये नांदेड विभागात एक्स्प्रेस रेल्वेगाड्या २४ दिवस तर पॅसेंजर रेल्वेगाड्या १९ दिवस १०० टक्के वेळेवर धावल्या.
दोन्ही मिळून १५ दिवस सर्व रेल्वे १०० टक्के वेळेवर धावल्या. त्यामुळे या महिन्यात नांदेड विभागात वेळापत्रकानुसार ९९.२२ टक्के रेल्वेगाड्या वेळेवर धावल्या. देशभरातील यादीत नांदेड विभागाच्या खालोखाल सियालदा विभाग,बिकानेर विभागाचा क्रमांक लागतो.