नांदगाव-मंगलोर रो-रो आजपासून

By admin | Published: December 17, 2015 12:59 AM2015-12-17T00:59:30+5:302015-12-17T00:59:30+5:30

पनवेलजवळील कोलाड ते मंगलोरपर्यंत कोकण रेल्वेची रो-रो सेवा सुरू असून, आता ती फोंडा-कणकवली येथील नांदगाव रेल्वे स्थानकापासून कोल्हापूर, रत्नागिरी, इचलकरंजी, जयसिंगपूर,

Nandgaon-Mangalore Ro-Ro from today | नांदगाव-मंगलोर रो-रो आजपासून

नांदगाव-मंगलोर रो-रो आजपासून

Next

कोल्हापूर : पनवेलजवळील कोलाड ते मंगलोरपर्यंत कोकण रेल्वेची रो-रो सेवा सुरू असून, आता ती फोंडा-कणकवली येथील नांदगाव रेल्वे स्थानकापासून कोल्हापूर, रत्नागिरी, इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, सातारा, कऱ्हाड, आदी शहरांतील ट्रक व अन्य वाहतूकदारांनाही मिळणार आहे. या नव्या सेवेचा प्रारंभ गुरुवारपासून होणार आहे.
१६ टनांच्या नियमित ट्रकसाठी या मार्गावर केवळ ६ हजार ३५० इतके भाडे आकारले जाणार आहे. या बाबतची माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी विनयकुमार, बी. बी. निकम, रघुराम शेट्टी यांनी कोल्हापुरातील ट्रकधारकांना दिली.
रो-रो रेल्वे सेवा म्हणजे, माल भरलेले ट्रक रेल्वेमधून नेणे व आणणे. एकाच वेळी या रेल्वेमध्ये ५० मालट्रक बसतात. या सेवेमुळे महामार्गावरील मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nandgaon-Mangalore Ro-Ro from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.