नंदुरबार बंदला हिंसक वळण

By admin | Published: February 5, 2015 01:34 AM2015-02-05T01:34:06+5:302015-02-05T01:34:06+5:30

अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला शहरात सायंकाळी हिंसक वळण लागले.

Nandurbar Bandala violent turn | नंदुरबार बंदला हिंसक वळण

नंदुरबार बंदला हिंसक वळण

Next

नंदुरबार : अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला शहरात सायंकाळी हिंसक वळण लागले. शहरातील एका भागात उसळलेल्या दंगलीचे लोण शहरभर पसरून दगडफेक व जाळपोळ झाली.
हिंसाचारात सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले. दंगेखोरांनी पोलिसांची दोन वाहने, अग्निशमन दलाचा बंबासह १५ वाहनांचे नुकसान केले. सायंकाळी सहा वाजता शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.
परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण असून राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या व धुळे येथून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले आहे. सकाळपासून बंद शांततेत सुरू असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील पत्राचौकी भागात किरकोळ दगडफेक झाली. मात्र अफवांमुळे जळका बाजार, ईलाही चौक, दोशाह तकीया, बागवान गल्ली या भागात दंगल उसळली. दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक झाली. दंगलखोरांनी दोन मोटारसायकली जाळल्या. पोलिसांच्या दोन वाहनांसह सहा मोटारसायकलींचे नुकसान केले. दगडफेकीत दोन पोलीस अधिकारी व पाच ते सहा कर्मचारी जखमी झाले. साधारण तासभर दंगलखोरांनी शहराला वेठीस धरले होते. सायंकाळी सहाला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले होते. (प्रतिनिधी)

च्दंगलखोरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दंगलखोरांनी टिळक वाचनालयामागील एका घरात घुसून तोडफोड केली. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनाचेही नुकसान केले.

Web Title: Nandurbar Bandala violent turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.