नंदुरबार - अॅस्ट्रोरिया शुगर ठरला सर्वाधिक दर देणारा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 07:45 PM2016-07-25T19:45:15+5:302016-07-25T19:45:15+5:30
अॅस्टोरिया शुगर कारखान्याने गेल्या हंगामातील ऊसाची एफआरपीनुसार ८० रुपये प्रतीटनाप्रमाणेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
उर्वरित पेमेंट जमा : दोन हजार ३० रुपये भाव
नंदुरबार : अॅस्टोरिया शुगर कारखान्याने गेल्या हंगामातील ऊसाची एफआरपीनुसार ८० रुपये प्रतीटनाप्रमाणेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. यापूर्वी कारखान्याने शेतकऱ्यांना १९५० रुपये प्रतीटनची रक्कम अदा केलेली आहे.
अॅस्टोरिया अॅग्रो अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याने २०१५-१६ या गळीत हंगामात पाच लाख पाच हजार २७३ मे.टन ऊस गाळप करून १०.७३ टक्के साखर उताऱ्याने पाच लाख ४० हजार ९९० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. ऊस गळीत व साखर उत्पादनात कारखान्याने उत्तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला आहे. एफआरपीप्रमाणे ऊस दर देणे संदर्भात ८०-२० टक्केच्या मानांकनाप्रमाणे एक हजार ९५० रुपये प्रती टन रक्कम यापूर्वीच ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. राहिलेली ८० रुपये प्रतीटन रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
खान्देशात सर्वाधिक ऊस दर देणारा अॅस्ट्रोरिया शुगर हा एकमेव कारखाना ठरला आहे. गेल्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी एक्झीकेटीव्ह डायरेक्टर शहाजी भगत यांनी जाहीर केल्याप्रमाणे हा दर देण्यात आला असल्याचे जनरल मॅनेजर यांनी सांगितले.