नंदूरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात अद्यापही विजेची प्रतिक्षा

By admin | Published: August 30, 2016 07:13 PM2016-08-30T19:13:19+5:302016-08-30T19:13:19+5:30

नंदूरबार जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नसल्याची स्थिती आहे

Nandurbar: Lightning waiting for still in remote areas of Satpuda | नंदूरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात अद्यापही विजेची प्रतिक्षा

नंदूरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात अद्यापही विजेची प्रतिक्षा

Next
>- मनोज शेलार / ऑनलाइन लोकमत 
४५ गावे ९६८ पाड्यांमध्ये काळोख
नंदूरबार, दि. 30 -  जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नसल्याची स्थिती आहे. या गावांमध्ये सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत बुडीत क्षेत्रातील ३३ गावे व १७६ पाड्यांचाही समावेश आहे. 
 
नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्युतीकरण करण्यासाठी मोठी कसरत होत आहे. अद्यापही सातपुड्यातील दुर्गम भागातील तब्बल ४५ गावे व ९६८ पाडे विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने सौरदिवे बसविले आहेत. परंतू त्यांचीही लाईफ अवघी एक ते दीड वर्ष राहत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे अद्यापही ही गावे काळोखातच आहेत. जिल्ह्यातील ९३० गावांपैकी ८८५ गावांचे विद्युतीकरण झालेले आहे. दोन हजार ९९१ पाड्यांपैकी २०२३ पाड्यांपर्यंत वीज पोहचली आहे. ४५ गावे व ९६८ पाड्यांना वीजेची प्रतिक्षा असून त्यात बुडीत क्षेत्रातील ३३ गावे, १७६ पाडे, बुडीत क्षेत्राव्यतिरिक्त १२ गावे व ७६३ पाड्यांचा समावेश आहे. विविध योजनांच्या माध्यमातून २०१६ अखेर १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित गाव व पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.
 
विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युती करण्यात येत असून त्यात डीपीडीसीच्या माध्यमातून २०१४-१५ मध्ये ४५ पाडे, २०१५-१६ मध्ये ५२ पाडे, त्याचवर्षी आदिवास उपयोजनेतून १२ गावे व ६० पाडे तर वनबंधू योजनेतून ४८ पाड्यांमध्ये तब्बल ४४ कोटी ८६ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
मोबाईल रेंज पोहचली, पण वीज नाही
विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांपर्यंत मोबाईलची रेंज पोहचलेली आहे. परंतू वीज पोहचलेली नसल्याचे विरोधाभास निर्माण करणारे चित्र देखील सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात पहावयास मिळते. भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलचे अनेक गावात मोबाईल टॉवर आहेत. त्या माध्यमातून दऱ्याखोऱ्यातील बऱ्याच गाव, पाड्यांपर्यंत मोबाईल रेंज पोहचत आहे. त्याचा चांगला परिणाम दळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होत आहे. परंतू अशा ठिकाणी वीज पोहचलेली नसल्यामुळे गावकऱ्यांना जवळच्या बाजारपेठेच्या गावात जावून तेथे किमान पाच रुपये ते २० रुपये देवून मोबाईल चार्जिंग करून घ्यावा लागतो. धडगाव, मोलगी या गावांमध्ये हे प्रकार सर्रास पहावयास मिळतात.
 

Web Title: Nandurbar: Lightning waiting for still in remote areas of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.