अहमदाबादेत नारायण राणे-मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकत्र प्रवास

By admin | Published: April 13, 2017 12:26 PM2017-04-13T12:26:35+5:302017-04-13T12:42:23+5:30

अहमदाबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Narayan Rane in Ahmedawada - Chief Minister Fadnavis' joint venture together | अहमदाबादेत नारायण राणे-मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकत्र प्रवास

अहमदाबादेत नारायण राणे-मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकत्र प्रवास

Next
>
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 13 - अहमदाबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. "एबीपी माझा"ने दिलेल्या बातमीनुसार, बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे स्कॉर्पिओ गाडीतून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी एकत्र दाखल झाले होते. 
 
राणे गोव्याहून अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस रात्री उशीरा शाहांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. मात्र यावेळी नारायण राणे दिसले नाहीत. या सर्व घडामोडीमध्ये राणे-शाह भेट झाली का नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. 
 
यानंतर गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या विमानानं नारायण राणे मुंबईत दाखल झाले. यावेळी अहमदाबाद दौ-याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता "खासगी कामासाठी जाऊ शकत नाही का?", असा उलट प्रश्नच यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उपस्थित केला. 

भेट न झाल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा फेल 
दरम्यान, नारायण राणे अहमदाबादेत मला किंवा भाजपाध्यक्ष अमित शाह यांना भेटलेच नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र प्रसिद्धी माध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये राणे आणि मुख्यमंत्री एकाच गाडीतून शाहांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा फेल गेला आहे.  
 
(अमित शाह-मुख्यमंत्री फडणवीस भेटीदरम्यान राणेही अहमदाबादेत)
भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून त्यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली. यामध्ये काहीही विशेष वाटत नसलं तरी महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्ये उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त येत आहे. त्यातच योगायोगाने हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये उपस्थित असल्याने राणेंच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळालं आहे.
(राणेसाहेबांच्या निर्णयानंतर अनेकांचं आयुष्य घडेल-बिघडेल - नितेश राणे)
 
"एबीपी माझा"ने दिलेल्या वृत्तानुसार नारायण राणे आणि मुख्यमंत्री किंवा अमित शाह यांच्या भेटीविषयी नेमकी माहिती समोर आलेली नाही.  नारायण राणे दुस-या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत हाच विषय चर्चेत होता का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. 
(भारत-पाक नेहमीच शत्रू म्हणून राहू शकत नाही - पाक NSA)
 
नारायण राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाली का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने रवाना झाले होते. बैठकीतील माहिती समोर येत नसली तरी या बैठकीमुळे राज्यातील राजकीय उकाडा वाढण्याची शक्यता आहे. 
 
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवली आहे. मी काँग्रेसमध्येच आहे. पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असे सांगत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांचे खंडन केले होते. काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मला आणि माझ्या कुटुंबाला डावलल जातेय असा आरोप त्यांनी केला होता.
 
 

Web Title: Narayan Rane in Ahmedawada - Chief Minister Fadnavis' joint venture together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.