चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला नारायण राणेंचा दुजोरा; म्हणाले, नव्या वर्षात राज्यात भाजपा सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 06:17 PM2021-11-22T18:17:51+5:302021-11-22T18:19:59+5:30

Narayan Rane News: महाराष्ट्रात नव्या वर्षात भाजपचे सरकार येईल या BJP प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil यांच्या विधानाची री ओढत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ते काहीतरी अंदाज घेऊनच बोलले असून बोलले ते खरे होईल अशी पृष्टी जोडत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो असे राणे म्हणाले.

Narayan Rane confirms Chandrakant Patil's statement; Said, BJP government in the state in the new year | चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला नारायण राणेंचा दुजोरा; म्हणाले, नव्या वर्षात राज्यात भाजपा सरकार 

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला नारायण राणेंचा दुजोरा; म्हणाले, नव्या वर्षात राज्यात भाजपा सरकार 

googlenewsNext

सावंतवाडी - महाराष्ट्रात नव्या वर्षात भाजपचे सरकार येईल या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची रि ओढत केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ते काहीतरी अंदाज घेऊनच बोलले असून बोलल खर होईल अशी पृष्टी जोडत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो असे राणे म्हणाले.
सावंतवाडीत भाजपच्या बैठकी नंतर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,महिला जिल्हाध्यक्षा सध्या तेरसे,जिल्हा परीषद अध्यक्षा संजना सावंत शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले आदि उपस्थीत होते.

एसटी च्या संपाला भाजपचा पाठींबा आहे.मात्र सरकारने आता काय तो निर्णय घेतला पाहिजे 40 आत्महत्या होईपर्यंत सरकार काय करत होते असा सवाल करत राणे म्हणाले एसटी कर्मचार्‍यांरी आंदोलना बाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असे ही राणे म्हणाले.रत्नागिरीत जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवा हा धक्का आहे का असे विचारताच राणे यांनी आम्ही याला धक्का मानत नाही मीच सर्वाना धक्के दात असल्याचे राणे यांनी सागितले.नव्या वर्षात भाजप सरकार येईल असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या विधानावर त्याच्याकडे काहि तरी अंदाज असेल तो घेऊनच बोलत असतील त्यामुळे बोलले खरे होईल  असे सांगत पाटील यांच्या विधानाची राणे यांनी रि ओढत महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेल्याची टिका ही महाविकास आघाडीवर केली.

पंतप्रधानाच्या निर्णयावर नो कॅमेट्स 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले यावर विचारलेल्या प्रश्नावर राणे बोलण्यास नकार देत पंतप्रधानाच्या निर्णयावर मी बोलू शकत नाही असे सांगत नो कमेंट्स असे म्हणाले.

Web Title: Narayan Rane confirms Chandrakant Patil's statement; Said, BJP government in the state in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.