राजकारण्यांना पुरस्कार हे पहिल्यांदाच ऐकतोय - नारायण राणे
By admin | Published: August 3, 2016 06:50 PM2016-08-03T18:50:45+5:302016-08-03T19:56:30+5:30
लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच राजकारण्यांना पुरस्कार मिळणार हे ऐकलं आहे असं काँग्रेस नेते नारायण राणे बोलले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच राजकारण्यांना पुरस्कार मिळणार हे ऐकलं आहे असं काँग्रेस नेते नारायण राणे बोलले आहेत. पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी नारायण राणे यांना काही प्रश्न विचारले त्यांना नारायण राणे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी प्रशांत दामले यांनी नारायण राणेंबद्दल एक आठवणही सांगितली. ए त्याला सुट्टी दे असा राणेंचा आदेश मिळाल्यानंतर मला सुट्टी मिळाली होती अशी आठवण प्रशांत दामलेंनी सांगितली. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये आपल्याला खूप मदत केली होती, अशी आठवण यावेळी प्रशांत दामले यांनी सांगितली.
अगोदरचे राणे कधी पाहायला मिळणार असा प्रश्नही प्रशांत दामले यांनी यावेळी विचारला. यावर राणेंनी साधा माणूस वेगळा आणि पद मिळाल्यानंतर वेगळा असं सांगत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. आम्ही जिथे जातो तिथे तसे व्हायचा प्रयत्न करतो. राजकीय माणूस एक कलावंत असतो. 24 तास काम करतो पण एक चूक आली की लगेच बोलता अशी खंतही नारायण राणेंनी व्यक्त केली. सगळी गुपित बाहेर सांगितली तर काम कारणं कठीण जाईल असंही राणे बोलले आहेत.
वर्षा गायकवाड यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा सदस्य) या पुरस्काराने सन्मान करण्यात आला
बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला विधीमंडळ सदस्यांची मुलाखत घेतली
आणखी वाचा...