"...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत"; नारायण राणे झाले भावूक, बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:44 IST2025-01-23T13:43:43+5:302025-01-23T13:44:48+5:30
Narayan Rane Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे भावूक झाले.

"...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत"; नारायण राणे झाले भावूक, बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट
Balasaheb Thackeray Jayanti: शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे यांनी आठवणींना उजाळा देत अभिवादन केलं. नारायण राणे यांनी खास पोस्ट लिहित बाळासाहेबांबद्दल त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. राणे यांनी एक खंतही व्यक्त केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या जीवनात काय स्थान आहे, याबद्दल पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याचबद्दल एका गोष्टीची खंतही त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरेंबद्दल नारायण राणेंची पोस्ट
नारायण राणेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "जन्मदिनानिमित्त साहेबांचे पुण्यस्मरण, आज साहेबांचा जन्मदिवस. साहेबांची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही. त्यांचे माझ्या जीवनातील स्थान अढळ आहे."
'साहेबांच्या पार्थिवाचे दर्शन माझ्या नशिबात असू नये...'
बाळासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त करताना राणे यांनी म्हटले आहे की, "साहेबांच्या पुण्यस्मरणासाठी मी माझे आत्मचरित्र 'झंझावात' मधील एक उतारा उद्धृत करतो. 'साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे. साहेब आणि माँसाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते. साहेबांच्या निधनाने माझ्या मनातला एक कोपरा निष्प्राण झाला."
साहेब 🙏#BalasahebThackeraypic.twitter.com/w3bK4h6Je1
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 22, 2025
"आजही मला विचाराल की, या जगातली माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे, तर मी बेधडकपणे 'बाळासाहेब ठाकरे' हेच एक नाव घेईन. ते माझ्यासाठी माझं जग होते आणि राहतीलही. माझ्या आयुष्यात कितीही चढउतार येऊ देत, मी आज जो कोणी आहे, त्यामागे त्यांचाच आशिर्वाद आहे हे मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही", अशा शब्दात नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.