शिवसेनेला कोकण मतदारसंघात विजय मिळवू देणार नाही - नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:42 PM2018-05-03T16:42:18+5:302018-05-03T16:42:18+5:30
विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये शिवसेनेला विजय मिळवू देणार नाही. या मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी गुरुवारी केली.
मुंबई - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये शिवसेनेला विजय मिळवू देणार नाही. या मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी गुरुवारी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक 21 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व रुसवे फुगवे विसरून शिवसेना आणि भाजपाने युती केली आहे. या युतीनुसार कोकणातील रायगड-रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेनेच्या अॅड. राजेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र भाजपाकडून राज्यसभेवर निवडून गेलेल्या खा. नारायण राणे यांनी शिवसेनेच्या कोकण मतदारसंघातील उमेदवारीस विरोध केला आहे. या मतदार संघात शिवसेनेला विजय मिळवू देणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच कोकण मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आपला उमेदवार देईल अशी घोषणाही नारायण राणे यांनी केली आहे.