CM उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा; नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 05:09 PM2021-08-29T17:09:01+5:302021-08-29T17:10:11+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भात विचारले असता नारायण राणेंनी थेट उत्तर दिले.

narayan rane react on cm uddhav thackeray and devendra fadnavis meet in mumbai | CM उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा; नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

CM उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा; नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Next

सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची घसरलेली जीभ, नारायण राणे यांचे अटक व जामीननाट्य, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर केलेली आंदोलने आणि जशास तसे उत्तर देण्याची भाजपने घेतलेली भूमिका यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान सिंधुदुर्गात पोहोचले. यावेळी नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भात विचारले असता नारायण राणेंनी थेट उत्तर दिले. (narayan rane react on cm uddhav thackeray and devendra fadnavis meet in mumbai)

“भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत”; जयंत पाटील यांचा दावा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अलीकडेच सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काही मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. यावरून चर्चेला उधाण आले आहे. नारायण राणे यांच्यासंदर्भात चर्चा झाली की अन्य मुद्द्यावर याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढवण्यात आले. राजकीय चर्चाही बरीच रंगली. यावर नारायण राणे यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. 

वैयक्तिक टीका कराल, तर जशास तशी रिॲक्शन मिळेल”; शिवसेना नेत्यांचा राणेंना इशारा

कोणी कोणाला भेटल्याने मला फरक पडत नाही

रविवारी सकाळी नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी या भेटीबाबत विचारले असता, बंद दाराआड ही तुमची भाषा आहे. उगाच लावालावी करु नका. कोणी कोणाला भेटल्याने मला फरक पडत नाही. उलट मी जास्त सुरु झालो आहे. कुठेच थांबलो नाही आणि थांबणारही नाही. मवाळ होणे माझ्या राशीत नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र

संजय राऊतांमुळे शिवसेनेची अधोगती

संजय राऊतांमुळे शिवसेनेची अधोगती होत आहे. सामना आणि शिवसेनेची प्रतिमा लोकांमध्ये अजिबात चांगली नाही. समोरासमोर भेटले की चांगले बोलायचे आणि फोन आला की ये रे माझ्या मालका. माझ्या मुलांसोबत बरोबरी करु नका. दोघंही हुशार आणि शिकलेले आहेत. संजय राऊत यांनी आधी मालकाची मुले काय करत आहेत हे पाहावे, असा पलटवार करत, जर त्यांनी वैयक्तिकपणे हल्ला करणे थांबवले नाही तर मीदेखील प्रहारमधून सुरु करेन. कोणाचे उठणे -बसणे, कुठे काय असते, काय करतात, कोणत्या केसमध्ये काय सुरु आहे याची मला माहिती आहे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. तसेच अनिल परब किती दिवस लपणार, असा खोचक सवालही यावेळी केला. 

“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

दरम्यान, आमच्यात केवळ ओबीसी आरक्षणाबाबतच चर्चा झाली. अन्य कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर दिले. बैठकीनंतर हॉलच्या बाजूला त्यांचे ऑफिस आहे, तिथे दहा मिनिटे आम्ही चर्चा केली. ती चर्चादेखील ओबीसी आरक्षणाबाबतच होती. जे बैठकीत झाले त्याबाबत काही मते मांडली होती, ती पुन्हा सांगितली. अशाप्रकारे आपण केले, तर तीन-साडेतीन महिन्यात आपण ओबीसींचे राजकीय आरक्षण परत करू शकतो, असेही सांगितले. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही सहकार्य करा, मी म्हणालो आम्ही संपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. याव्यतिरिक्त काही आमची चर्चा झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: narayan rane react on cm uddhav thackeray and devendra fadnavis meet in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.