राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:01 PM2020-05-26T15:01:33+5:302020-05-26T15:02:40+5:30

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते.

Narayan rane react on Sudhir Mungantivar's talk of president rule is not by BJP hrb | राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचे वाढते रुग्ण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. तसेच त्यांनी ही आपली राज्यपालांकडे केलेली वैयक्तीक मागणी असून भाजपाची भुमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावर प्रतिक्रिया देणाऱ्या भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही तोंडसुख घेतले. 


नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. यावर बाळासाहेब थोरात यांनी राजकारण करू नये असे म्हटले होते. यावर थोरातांना महाराष्ट्राचा काय अभ्यास आहे. महसूलमंत्री पद घरात मिळाले चांगले आहे. त्यांना विचारा हे सरकार पाच वर्षे टिकेल का? राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी असे मला वाटत असल्याचे राणे म्हणाले. तसेच चला एकत्र जाऊया आणि राज्यातील हॉस्पिटल पाहुयात, असे आव्हान राणे यांनी  थोरातांना दिले. तसेच गुजरातच्या अवस्थेवर बोलण्यास नारायण राणेंनी नकार दिला. 


नारायण राणेंच्या राज्यपाल भेटीवर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांची वैयक्तीक आहे. भाजपाची ही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर राणे यांनी सुधीर मुनगंटीवारना विचारतेय कोण? असा सवाल करत पक्षश्रेष्ठी यावर सांगतील. मुनगंटीवार वरिष्ठ नेते असतील पण मी देखील माजी मुख्यमंत्री आहे, असे सांगत मुनगंटीवार यांना इशारा दिला. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

Web Title: Narayan rane react on Sudhir Mungantivar's talk of president rule is not by BJP hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.