महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये प्रचार दौरा करणार - नारायण राणे

By Admin | Published: January 20, 2017 08:13 PM2017-01-20T20:13:58+5:302017-01-20T20:13:58+5:30

राज्यातील १0 महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये आपण प्रचार दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी प्रचारसभा घेणार आहे.

Narayan Rane will campaign for publicity tour in Municipal Corporation, Zilla Parishad | महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये प्रचार दौरा करणार - नारायण राणे

महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये प्रचार दौरा करणार - नारायण राणे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कणकवली. दि. 20 -  राज्यातील १0 महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये आपण प्रचार दौरा करणार असून प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी प्रचारसभा घेणार आहे. तसेच ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेसाठी जास्त वेळ देणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी दिली.
कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, मुंबई शहरावर गेली २२ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने मुंबई शहराची वाट लावली. ही पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याचे मत भाजपाचे नेतेच व्यक्त करतात आणि आता युती करण्यासाठी म्हणे बोलणी करत आहेत. एक मेकांची उणीधुणी काढणा-या या दोन्ही पक्षांची मिलीभगत असून आम्ही मतदारांना आणि नागरिकांना तेच पटवून देणार आहोत. महापालिकेसाठी त्यामुळे जरी या दोघांची युती झाली तरी  काँग्रेसच्या यशामध्ये तिळमात्र फरक पडणार नाही. 
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या  काळात गेल्या २0 वर्षात मुंबईतील नागरिकांवर किती कर लावले याची माहिती आधी घ्यावी. त्यानंतरच त्यांनी त्याबाबत भाष्य करावे. तसेच नेमके कोणते कर कमी करणार हे त्यानी सांगावे. मात्र त्यांना दूरदृष्टीच नाही. त्यामुळे ते याबाबत काय सांगणार ? मुंबईतील नाले, गटार ,रस्ते अशा सर्वच कामात भ्रष्टाचार झाला असून शिवसेना, भाजप त्याला जबाबदार असून फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते आता एकमेकांवर आरोप करीत आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराला माझा पाठिंबा असणार नाही. शेकाप जरी विरोधी पक्ष असला तरी शिवसेना, भाजपशी  त्यांचा अंतर्गत संबध आहे. असेही राणे यांनी यावेळी सांगितले. 
 
काँग्रेसमध्ये दुफळी नाही
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस मधील नेत्यांची दुफळी दिसून येत आहे. याबाबत आपले म्हहणणे काय?असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, वैचारिक मतभेद तर सर्वच पक्षात असतात. मात्र, त्याला दुफळी म्हणता येणार नाही. मतभेद असले तरी काँग्रेस मधील सर्व नेते निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येतील आणि विजय मिळवतील.
 
सत्तेत आहोत, सत्तेत रहाणार!
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सत्तेत सध्या आम्ही आहोत आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी यापुढेही सत्तेत रहाणार आहोत. येथील जनता आमच्या सोबत असल्याने  विरोधकांनी कितीही आरोप केले तरी  विजय आमचाच आहे असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना - भाजप युती करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक एकत्रितपणे लढले तरी काँग्रेसवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जिल्हा परिषदेच्या पन्नासही जागांवर काँग्रेसचेच उमेदवार विजय मिळवून पुन्हा सत्ता काबिज करतील.
 
प्रथमेश तेली हल्ला प्रकरणात काडीमात्र संबंध नाही
प्रथमेश तेली याच्यावर दादर येथे झालेल्या हल्ला प्रकरणात नीतेश राणे किवा काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही. लोकांची दिशाभूल करण्याचे विरोधकांनी आता सोडावे, असे नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

Web Title: Narayan Rane will campaign for publicity tour in Municipal Corporation, Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.