नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, दस-यापूर्वी पुढील भूमिका जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 07:30 AM2017-09-22T07:30:26+5:302017-09-22T07:30:49+5:30

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घटस्थापनेदिवशी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यांनी हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.

Narayan Ranechi will release the next role, ten ahead of the next | नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, दस-यापूर्वी पुढील भूमिका जाहीर करणार

नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, दस-यापूर्वी पुढील भूमिका जाहीर करणार

ओसरगाव (कणकवली) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घटस्थापनेदिवशी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यांनी हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. राणे म्हणाले, २00५मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी आपली त्यांच्याशी भेट घडविली. या भेटीत आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आले होते.
४८ आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असतानाही आपल्याला डावलण्यात आले. अशोक चव्हाण यांना आमदारांचा पाठिंबा नसताना मुख्यमंत्री करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले महसूल खाते काढून उद्योग खाते दिले. विधान परिषदेत ज्येष्ठ असूनही माझी गटनेतेपदी निवड झाली नाही़ यापुढे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दसºयापूर्वी माझी पुढील दिशा जाहीर करेन. येत्या काळात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज्यातून रिकामे करणार असल्याचे सांगितले.
>नितेश राणे काँग्रेसमध्येच!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. मात्र, आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा अथवा आमदारकीचा राजीनामा न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
>राणे जे काही बोलले त्यात कोणतेही तथ्य नाही. मला यापेक्षा जास्त काहीही बोलायचे नाही. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा!
- खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
राणे यांची स्वत:विषयी काय समजूत आहे माहिती नाही. काँग्रेसने त्यांना भरभरून दिले. पक्ष सोडू नये असे मी शेवटपर्यंत त्यांना सांगत होतो.
- हुसेन दलवाई, राज्यसभा सदस्य

Web Title: Narayan Ranechi will release the next role, ten ahead of the next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.