नारायण राणेंनी कोंबड्या विकाव्यात - शिवसैनिक

By admin | Published: April 15, 2015 11:21 AM2015-04-15T11:21:22+5:302015-04-15T14:10:49+5:30

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत नारायण राणे पराभवाच्या छायेत असून शिवसेनेच्या तृप्ती सावंत या विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहे.

Narayan Ranee to sell poultry - Shiv Sainik | नारायण राणेंनी कोंबड्या विकाव्यात - शिवसैनिक

नारायण राणेंनी कोंबड्या विकाव्यात - शिवसैनिक

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत नारायण राणे पराभवाच्या छायेत असून शिवसेनेच्या तृप्ती सावंत या विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहे. हा निकाल पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह संचारला असून हातात कोंबड्या घेऊन शिवसैनिक मोठ्या प्रमाणात वांद्रे पूर्वेत जमले आहे. नारायण राणेंनी राजकीय सन्यास घेऊन कोंबड्या विकायला पाहिजे असा खोचक टोला शिवसैनिकांनी लगावला आहे. 

मातोश्रीच्या अंगणात पार पडणारी वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक चांगलीच गाजत आहे. काँग्रेसने नारायण राणेना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने शिवसैनिकांमध्ये भलताच चेव आला. बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या नारायण राणेंनी थेट मातोश्रीत जाऊन शिवसेनेला आव्हान दिल्याने शिवसेना व नारायण राणे या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. बुधवारी मतमोजणीत शिवसेनेचा विजय निश्चित झाल्याचे समजताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. त्वेषात असलेल्या काही शिवसैनिकांनी जुहूतील नारायण राणेंच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला. 

वांद्रे पूर्व निवडणुकीत तृप्ती सावंत यांना रश्मी ठाकरे यांनीदेखील पाठिंबा देत त्यांना सर्वतोपरी मदत केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याही चांगल्याच सक्रीय झाल्याचे दिसत होते.शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनीही नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. शिवसेनेच्या महिला रणरागिणींनी राणेंना त्यांची जागा दाखवली अशी प्रतिक्रिया एका महिला कार्यकर्त्याने दिली. तर अनेक शिवसैनिक हातात कोंबडी घेऊन आले होते. राणेंनी राजकीय सन्यास घेऊन कोंबडी विकावी अशी घोषणाही या प्रसंगी दिल्या जात आहेत. 

Web Title: Narayan Ranee to sell poultry - Shiv Sainik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.