नारायण राणे यांचा निर्णय लटकलेलाच

By Admin | Published: July 24, 2014 02:32 AM2014-07-24T02:32:58+5:302014-07-24T18:15:17+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत आजही कुठलाच निर्णय होऊ शकला नाही. राणो यांनी मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला

Narayan Rane's decision will be hanging | नारायण राणे यांचा निर्णय लटकलेलाच

नारायण राणे यांचा निर्णय लटकलेलाच

googlenewsNext
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत आजही कुठलाच निर्णय होऊ शकला नाही. राणे यांनी मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीला राणो उपस्थित नव्हते. 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर काल मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा केली. यासंदर्भात आपण पक्षश्रेष्ठींशी बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राणे यांना दिले होते. मात्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ ठरली नाही. त्यामुळे राजीनाम्याबाबत अनिश्चितता कायम आहे. (विशेष प्रतिनिधी)
 
मुख्यमंत्र्यांचा झपाटा
मुख्यमंत्री चव्हाण यांनी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते आणि मंत्र्यांशी सह्याद्री अतिथीगृहावर विभागवार चर्चा केली. नगरपालिका कर्मचा:यांचा संप त्यांनी सोडविला. महाराष्ट्र सदनाबद्दल चौकशीचे आदेश दिले. रात्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला ते हजर होते.

 

Web Title: Narayan Rane's decision will be hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.