नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:28 PM2019-04-25T22:28:00+5:302019-04-25T22:29:00+5:30

'मालवणमध्ये येतेय सत्याला शब्दांची धार!'

Narayantra kun karar ?, the candidate goes down to the 'Swabhimaan'; BJP's secret support? | नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा?

नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा?

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. दुसरीकडे, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिवसेना आणि भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांमधील कडव्या लढतीमुळे या मतदार संघाच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

गेल्या दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी- सिंधुदुर्गातील मतदान पार पडले. यानंतर भाजपाचे नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी एकप्रकारे स्वाभिमानच्या उमेदवारीचे समर्थन करत अप्रत्यक्षपणे नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवर टीका करताना कोकणी माणसाने उमेदवार उतरवून जपला आपला "स्वाभिमान" असे म्हणत स्वाभिमानच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. तसेच, त्यांनी नारायण राणे लिहीत असलेल्या आत्मचरित्राबाबत देखील उत्सुकता व्यक्त केली आहे. 

आशिष शेलार ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले," मालवणमध्ये येतेय सत्याला
शब्दांची धार!
नारायणस्त्राचे कुणाकुणावर प्रहार?
कोकणी माणसाने उमेदवार उतरवून जपला आपला "स्वाभिमान"
इंजिन भाड्याने देऊन एका पक्षाने विकला आपला अभिमान!
आत्मचरित्र स्वाभिमानाचे वाचावे?की विकावू व्हिडीओ बघत बसावे?तुमचे तुम्हीच ठरवा! 


नारायण राणे आत्मचरित्र लिहिणार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे लवकरच आत्मचरित्र लिहिणार आहेत. नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच टविटच्या शेवटी 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा'' असे सांगत नितेश राणे यांनी नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होणार असल्याचे संकेतच दिले आहेत. 

Web Title: Narayantra kun karar ?, the candidate goes down to the 'Swabhimaan'; BJP's secret support?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.