"संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात..."; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:39 PM2024-06-10T18:39:11+5:302024-06-10T18:57:38+5:30

लोकसभेच्या निकालाबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी संविधान बदलाच्या चर्चेचा फटका बसल्याचे मान्य केले.

Narendnra Modi opened up about the Constitution Chhagan Bhujbal at NCP program | "संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात..."; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

"संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात..."; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

Chhagan Bhujbal : भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेलं नाही. २४० जागांसह भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, भाजपला ३७०  आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. इतर कोणत्याही कारणांपेक्षा, चार सौ पार या घोषणेने भाजपचे सर्वाधिक नुकसान केले. पक्षांच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान ही घोषणा मतदारांना पटवून देण्यासाठी संविधान बदलण्यासाठी आम्हाला ४०० जागांची गरज आहे, असं म्हटलं होतं. यामुळे भाजपला याचा जबर फटका बसला. आता घटना बदलणार या कथानकाचा फटका बसल्याची कबुली मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यघटना बदलण्याबाबत भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांचा फटका पक्षाला सहन करावा लागला. या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान बदलणार असा समज झाल होता असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते.

"पंतप्रधान मोदी यांनी टीव्हीवर त्याबाबत १५ मिनिटे मी संविधान बदलणार नाही असा खुलासा केला. पण तोपर्यंत लोकांच्या डोक्यात घुसलं होतं की ४०० पार म्हणजे आमचा बेडा पार. हे सगळ्यांच्या डोक्यात गेले. दोन्ही समाजाची लोकसंख्या एका बाजूला गेली तर आपलं काय. आदिवासी समाज सुद्धा या गोष्टीला घाबरला. संविधान बदलल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांच्या डोक्यात आलं. तसे काही करणार नाही आहेत पण लोकांचा समज झाला. आपलं नुकसान कसे होईल त्या पद्धतीने विरोधी पक्षाने काम केलेच असणार. आपण शेवटी त्यात काही सुधारणा करु शकलो नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आता विधानसभेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये संविधानाचा काही प्रश्न नाही. संविधान बदलायचा प्रचार लोकसभेच्या निवडणुकीत झाला. आपले दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी हे मतदार परत मिळवावे लागतील. कोण काय म्हणते ते बाजूला राहूद्या," असे छगन भुजबळ म्हणाले.

Web Title: Narendnra Modi opened up about the Constitution Chhagan Bhujbal at NCP program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.