Narendra Modi in Pune : "गंदा है पर धंदा है"; 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 03:53 PM2022-03-06T15:53:54+5:302022-03-06T15:55:05+5:30

Narendra Modi in Pune: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले.

Narendra Modi in Pune | "Dirty but its business"; Nitesh Rane criticizes Shivsena over Narendra Modi's advertisement in 'Saamana' | Narendra Modi in Pune : "गंदा है पर धंदा है"; 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन राणेंची टीका

Narendra Modi in Pune : "गंदा है पर धंदा है"; 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन राणेंची टीका

googlenewsNext

पुणे: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुणे मेट्रोसह विविध विकास कामांचे उद्घाटन केले. दरम्यन, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. पण, शिवसेनेकडून कोणतीही भूमिका उघडपणे घेण्यात आली नाही. यातच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी सेनेवर निशाणा साधलाय.

राणेंचा 'प्रहार'...
एरवी 'सामना'तून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जहरी टीका केली जाते. पण, आता सामनाच्या पहिल्याच पानावर पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जाहिरात झळकली. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी 'गंदा है पर धंदा है' असे म्हणत सामनाचा फोटो ट्वीट केलं आहे.

असा होता पंतप्रधानांचा पुणे दौरा
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौऱ्यात पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर मोदींनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंदनगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी मेट्रोचे तिकीट स्वतः पंतप्रधान मोदींनी काढले. तसेच, मेट्रोत मोदींनी दिव्यांग मुलांशी गप्पा मारल्या. यानंतर एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मोदींनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले.
 

Web Title: Narendra Modi in Pune | "Dirty but its business"; Nitesh Rane criticizes Shivsena over Narendra Modi's advertisement in 'Saamana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.