नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:04 PM2024-09-19T17:04:41+5:302024-09-19T17:06:57+5:30

PM Vishwakarma Yojana : या कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी हे प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. 

Narendra Modi to visit Maharashtra tomorrow, intense preparation for PM Vishwakarma Yojana program in Vardha | नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी

नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी

PM Vishwakarma Yojana :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० सप्टेंबरला महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास नरेंद्र मोदी येथे आयोजित पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी हे प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. 

या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा योजनेतील यशस्वीगाथा दर्शविण्यासाठी थीम पॅव्हेलीयनची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये देशभरातील १८ कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. तसेच, कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण देखील होणार आहे.

याचबरोबर, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अमरावती येथे  प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणीही  होणार आहे. महाराष्ट्र् औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून हे पार्क १००० एकरात उभारण्यात येत आहे. सरकारने वस्त्रोद्योग उद्योगासाठी सात पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी दिली आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. 

या पार्कमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. तसेच, पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' योजनेचा शुभारंभ करतील. राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आणि विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. याचबरोबर, पंतप्रधानांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा' शुभारंभ होणार आहे. 

Web Title: Narendra Modi to visit Maharashtra tomorrow, intense preparation for PM Vishwakarma Yojana program in Vardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.