मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 07:49 PM2019-10-16T19:49:00+5:302019-10-16T19:51:53+5:30

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे.

Narendra Modi's Gujarat too hit by recession, 7 diamond artisans commit suicide in surat, hardik patel says | मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या 

मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या 

googlenewsNext

अहमदाबाद - देशातील मंदीचा फटका अनेक उद्योग धंद्यांना बसला आहे. गुजरातमधील हिरा व्यापाऱ्यांच्या उद्योगालाही याचा फटका बसला आहे. पाटीदार समजाचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील मंदीबाबत बोलताना गुजरातमधील भीषण वास्तव सांगितले. गुजरातमधील हिरा कामगारांनी मंदीमुळे आत्महत्या केल्याचं पटेल यांनी म्हटलंय. 

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे. मोदींच्या गुजरातमध्येही या मंदीचा फटका जाणवत असून हे गंभीर असल्याचं हार्दीक पटेल यांनी म्हटलंय. सुरतमधील हिरा उद्योगात एका कलाकाराने आत्महत्या केली आहे. गेल्या महिनाभरात सुरतमध्येच मंदीमुळे 7 हिरा कारागिरांनी आत्महत्या करुन सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मंदीमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही, असेही हार्दीक पटेल यांनी म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अनेकांनी आपली मते नोंदवली असून अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या पतीनेही चिंता व्यक्ती केली होती.   

देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, "देशातील अर्थव्यवस्थेवर १९९१, १९९८  आणि २00८ अशा तीन वेळा संकट आले. पण, ते देशांतर्गतपेक्षा जागतिक पातळीवरील घडामोडीमुळे आले होते. याउलट २0१९ मध्ये आलेली परिस्थिती मात्र देशातंर्गत असून सरकारच्य वैयक्तीक धोरणामुळे ओढवली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन धोरणांनी अर्थव्यवस्थेच कंबरडेच मोडून टाकले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याऐवजी कार्पोरेट क्षेत्राला करसवलतीचा तकलादू उपाय केला जात आहे. यातून मोजक्याच श्रीमंताना फायदा झाला", असेही यशवंत सिन्हा यांनी पत्रकाराशीं बोलताना सांगितले. 


 

Web Title: Narendra Modi's Gujarat too hit by recession, 7 diamond artisans commit suicide in surat, hardik patel says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.