'सरकारमध्ये बसलेले काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:30 IST2021-09-02T17:18:55+5:302021-09-02T17:30:00+5:30
Maratha Reservation : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

'सरकारमध्ये बसलेले काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?'
कराड: मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा राजकारण तापत आहे. आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनीही सरकारवर तोंडसुख घेतलंय. 'महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही, असा आरोप त्यांनी केलाय. ते आज कराडमध्ये बोलत होते.
https://t.co/avt1Y3ar49
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
'शिवस्मारकाचा विषय निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे'#VinayakMete#vijayvadettiwar#UddhavThackeray#AshokChavan
यावेळी नितीन पाटील म्हणाले की, सरकारला मराठा समाजाबद्दल काहीच आस्था नाही. राज्यातील 30 हजार युवा उद्योजकांना या योजनेतून 200 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. दरवर्षी 96 कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्यानं उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?, अशी टीका नरेंद्र पाटलांनी यावेळी केली.