नेरीच्या दसरा महोत्सवाला शतक

By admin | Published: October 10, 2016 07:01 PM2016-10-10T19:01:37+5:302016-10-10T19:01:37+5:30

चिमूर तालुक्यातील नेरी येथील दंडारु वाकडे व किसन दडमल यांनी सुरु केलेल्या दसरा महोत्सवाला उद्या ११ आॅक्टोबर रोजी शतक पूर्ण होत आहे.

Nari's Dussehra Festival | नेरीच्या दसरा महोत्सवाला शतक

नेरीच्या दसरा महोत्सवाला शतक

Next

ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि.10 - चिमूर तालुक्यातील नेरी येथील दंडारु वाकडे व किसन दडमल यांनी सुरु केलेल्या दसरा महोत्सवाला उद्या ११ आॅक्टोबर रोजी शतक पूर्ण होत आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सायंकाळी चिमूर-नेरी मार्गा वरील रस्त्याजवड रावनदहन करण्यात येणार आहे.
नेरी येथे काही पिढ्यांपासून दसरा महोत्सवाची परंपरा अजूनही अविरत सुरू आहे. सर्वप्रथम दंडारु वाकडे व किसन दडमल यांनी या महोत्सवाची परंपरा सुरू केली.हीच परंपरा सध्या तरुणांनी स्वीकांरुन सुरू ठेवली आहे.
उद्या मंगळवारला आयोजित करण्यात आलेल्या दसरा महोत्सवात राम, लक्ष्मण,सिता, हनुमान आदींची वेशभूषा करुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आधी रामनगर म्हणून ओळखल्या जाणारया व सध्या गांधी वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या या वॉर्डातून ही मिरवणूक संपूर्ण गावातून
भ्रमण करीत चिमूर-नेरी मार्गाकडे प्रस्थान करील.या मिरवणूकीत भारत माता झांकी तसेच शेतकरयांना आत्महत्या थांबविण्याचा संदेश देणारी झाकी तसेच महात्मा गांधी यांच्या वेशभूषतुन अहिंसेचा संदेश
या झाकीतून देण्यात येणार आहे.
तसेच परंपरागत वर्षापासून गावातुन काढण्यात येणारा रथ या मिरवणूकी मध्ये सहभागी राहील. यात तरुन आपआपल्या कलेचे प्रदर्शन करतील.मिरवणूकीतील रथ ट्रॅकरच्या माध्यमातून ओढल्या जात आहे.या रथावरती लाकडाचा भव्य चक्र असुन तो गोल फिरत असतो. नागरीकाचे आकर्षण या चक्राच्या माध्यमातुन दिसुन येते. शतकाचा झालेल्या दसरा महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे .चिमूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरीक याठिकाणी येऊन महोत्सवाचा लाभ घेतात .गोरजाई व दसरा उत्सवाची पुजा केल्यानतर सायंकाळी ६च्या सुमारास रावण दहन करुन मिरवणूक गावामध्ये परत जाते. शिवाय रात्रीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन दसरा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Web Title: Nari's Dussehra Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.