नरसिंग यादवसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, क्रीडामंत्र्यांना लिहिलं पत्र

By admin | Published: July 26, 2016 12:39 PM2016-07-26T12:39:20+5:302016-07-26T12:39:20+5:30

भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून क्रीडामंत्र्यांना याप्रकरणी पत्रदेखील लिहिलं आहे

For the Narsingh Yadav, the letter written by the Sports Minister to Chief Minister Fadnavis Maidan | नरसिंग यादवसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, क्रीडामंत्र्यांना लिहिलं पत्र

नरसिंग यादवसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, क्रीडामंत्र्यांना लिहिलं पत्र

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि, 26 - भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडामंत्र्यांना याप्रकरणी पत्रदेखील लिहिलं आहे. विखे-पाटलांच्या मागणीला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. 'नरसिंग यादव प्रकरण संशयास्पद वाटत आहे. आमचा नरसिंग यादवला पुर्ण पाठिंबा असल्याचंही', मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.
 
(नरसिंगचा ‘साई’वर संशय)
 
७४ किलो फ्रीस्टाईल गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणारा नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला असून रिओ ऑलिम्पिकमधील सहभाग अनिश्चिततेच्या भोव-यात सापडला आहे. नरसिंग उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला आहे.  नाडाने पाच जुलैला सोनीपत येथील साईच्या केंद्रात नरसिंगची उत्तजेक चाचणी केली होती. त्याच्या ए चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला बी टेस्टसाठी बोलवण्यात आले. त्याचाही अहवाल  पॉझिटिव्ह आला. नाडाने आपला अंतिम अहवाल भारतीय कुस्ती महासंघाला पाठवून दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने ही बाब क्रीडा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली.
 
(नरसिंगला अडकविण्यात आले)
(ऑलिम्पिकपूर्वी नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी)
 
ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी नरसिंग यादव डोपचाचणीत अपयशी ठरल्यामुळे निराश झालेले त्याचे प्रशिक्षक जगमाल सिंग यांनी या मल्लाला अडकवण्यात आल्याचे सांगत राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीला (नाडा) त्याची पुन्हा चाचणी घेण्याचे आवाहन केले आहे.
 
(नरसिंग यादव निर्दोष आहे - भारतीय कुस्ती महासंघ)
 
नरसिंगने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावताना ७४ किलो वजन गटात आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. दिग्गज मल्ल सुशील कुमारऐवजी नरसिंगला आॅलिम्पिकसाठी पसंती दर्शविण्यात आली. सुशीलने निवड चाचणीची मागणी केली होती, पण भारतीय कुस्ती महासंघ आणि दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळली. दरम्यान, सुशील कुमारचे मेंटर सतपाल सिंग यांनी संकेत दिले की, गरज भासली तर दोनदा आॅलिम्पिक पदकाचा मानकरी ठरलेला सुशील कुमार नरसिंगचे स्थान घेण्यास सज्ज आहे. 
 

Web Title: For the Narsingh Yadav, the letter written by the Sports Minister to Chief Minister Fadnavis Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.