नार्वेकर, जानभोर यांना पत्रकारिता पुरस्कार

By admin | Published: April 6, 2016 10:06 PM2016-04-06T22:06:49+5:302016-04-06T22:06:49+5:30

नागपूरच्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानतर्फे अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचे मुंबईतील राजभवनात थाटात वितरण झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Narvekar, Jambhar to receive the journalism award | नार्वेकर, जानभोर यांना पत्रकारिता पुरस्कार

नार्वेकर, जानभोर यांना पत्रकारिता पुरस्कार

Next

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुंबई: नागपूरच्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानतर्फे अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचे मुंबईतील राजभवनात थाटात वितरण झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यभरातील ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जीवनगौरव पुरस्कार मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना तर नागपूर विभागीय पुरस्कार नागपूर ‘लोकमत’च्या गजानन जानभोर यांना प्रदान करण्यात आला. राजभवनात बुधवारी संध्याकाळी हा सोहळा थाटात पार पडला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात समाजजागृती आणि सामाजिक जीवनस्तर उंचावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना गेल्या दशकभरापासून विदर्भाच्या स्तरावर हे पुरस्कार दिले जात होते. यंदा प्रथमच राज्यस्तरावर या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विभागनिहाय पुरस्कार पटकावणे पत्रकार असे: मुंबई विभाग -शर्मिला कलगुटकर (मुंबई), पुणे-सातारा-सोलापूर विभाग- प्रशांत जोशी (सोलापूर), कोल्हापूर-सांगली-कोकण विभाग- जयसिंग कुंभार (सांगली), उत्तर महाराष्ट्र विभाग -दीप्ती राऊत (नाशिक), अमरावती विभाग -सोमनाथ सावळे (बुलढाणा), नागपूर विभाग -गजानन जानभोर (नागपूर), मराठवाडा विभाग -प्रमोद कुलकर्णी (बीड), विशेष पुरस्कार -इंग्रजी- संतोष आंधळे (मुंबई), हिंदी- संजय देशमुख (नागपूर).

- पत्रकारांवरील हल्ले थांबावेत - राज्यपाल
राज्यासह अन्य ठिकाणीही पत्रकारांवर होणारे हल्ले क्लेषदायक असल्याचे राज्यपाल विद्यासागर यांनी सांगितले. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदा आणण्याची सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कायद्यासाठी गंभीर असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. पत्रकारांची सहकार्य लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी तसेच प्रशासकीय सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी अत्यावश्यक असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

Web Title: Narvekar, Jambhar to receive the journalism award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.