नाशिक - ९ गावातील संचारबंदी मागे

By admin | Published: October 16, 2016 11:00 AM2016-10-16T11:00:16+5:302016-10-16T11:00:16+5:30

ग्रामीण भागातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील नऊ गावांत लागू करण्यात आलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे.

Nashik - 9 behind the curfew in the village | नाशिक - ९ गावातील संचारबंदी मागे

नाशिक - ९ गावातील संचारबंदी मागे

Next

ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. १६ - तळेगाव येथील बालिकेवरील अत्याचारानंतर उसळलेल्या हिंसाचारावर पोलीस प्रशासनाने नियंत्रण आणल्यानंतर ग्रामीण भागातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील नऊ गावांत लागू करण्यात आलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे.  पाच दिवसापुर्वी अंदोलनाला हिंसक वळन लागल्यानंतर नाशिक मधील नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली होती. 
 
पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील विल्होळी, वाडीवऱ्हे शेवगेडांग गोंदे तसेच त्र्यंम्बक तालुक्यातील तळेगाव, तळवाडे आणि अंजिनेरीं या गांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. याशिवाय जिल्ह्यात दंगलीचे ४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे अथवा भावना भडकाविणाऱ्या पोस्ट प्रकरणी ७ ग्रुप ऍडमिनला पोलिसांनी अटक केल्याची माहिती नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली.

Web Title: Nashik - 9 behind the curfew in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.