नाशिक पुन्हा गारठले! ब्रह्मपुरी 9.5 अंश सेल्सिअस; मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:22 AM2018-01-22T03:22:26+5:302018-01-22T03:22:46+5:30
मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५ वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते.
नाशिक/पुणे : मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५ वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते.
विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून, किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भात ब्रह्मपुरी येथे ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
पुणे शहरात शनिवारपासून किमान तापमानात घट झाली आहे़ पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील किमान तापमानात घट झाली आहे़
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे १०़९, कोल्हापूर १२, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १२़६, नाशिक १०़८, सांगली १४, सातारा ११़५, सोलापूर १३़१, मुंबई २०, सांताक्रुझ १७, अलिबाग १८़७, रत्नागिरी १७़१, पणजी १९़५, डहाणू १७़८, भिरा १५़५, औरंगाबाद १२, परभणी १०़५, नांदेड १२, अकोला १३़५, अमरावती १४, बुलडाणा १४़४, ब्रह्मपुरी ९़५, चंद्रपूर ११़२़