नाशिक शस्त्रसाठा प्रकरण; आणखी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:32 AM2017-12-21T03:32:23+5:302017-12-21T03:32:35+5:30
नाशिक शस्त्रसाठा प्रकरणात शिवडीतून आणखी तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तिघेही वेंडर आहेत. त्यांनी शस्त्रसाठ्यासाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो गाडीत चोरकप्पे बनविण्यास मदत केली होती.
मुंबई : नाशिक शस्त्रसाठा प्रकरणात शिवडीतून आणखी तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तिघेही वेंडर आहेत. त्यांनी शस्त्रसाठ्यासाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो गाडीत चोरकप्पे बनविण्यास मदत केली होती.
मेहताब खान, मोहम्मद सिद्दिकी आणि शेहजाद शेख अशी आरोपींची नावे आहेत. उत्तरप्रदेशातील गोदामातून शस्त्रसाठा चोरी करण्यासाठी मास्टरमार्इंड बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमीत उर्फ सुका उर्फ पाशा (२७) ने अंबोलीतून बोलेरो गाडी चोरी करण्याचा डाव आखला. गाडी चोरीमध्ये सलमान अन्वर कुरेशी, संजय साळुंखे, वाजीद शेखने मदत केली. नाशिक पोलिसांनी शिवडीतून अटक केलेल्या अमीर रफिक शेख उर्फ लंगडाने गाडीतील चोरकप्पे तयार केले. या कामासाठी त्याने मेहताब, मोहम्मद, शेहजादची मदत घेतल्याचे उघड होताच या तिघांनाही अटक करण्यात आली. तिघेही वेंडर म्हणून अमीरसोबत काम करायचे.
२६तारखेपर्यंत कोठडी-
तिघांनाही बुधवारी न्यायालयाने २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे अजय सावंत यांनी दिली. बोलेरो चोरी प्रकरणात पाशाचा सहभाग असल्याने त्याचाही ताबा घेण्यात येणार असल्याचे समजते.