नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर धनकवाडीत जेरबंद
By admin | Published: June 6, 2016 07:05 PM2016-06-06T19:05:48+5:302016-06-06T19:05:48+5:30
गेल्या तीन दिवसांपासून येवला तालुक्यातील ठाणगाव ,तांदुळवाडी ,धनकवाडी आदि भागात दहशद घालणार्या बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटोदा (नाशिक ), दि. ६ - गेल्या तीन दिवसांपासून येवला तालुक्यातील ठाणगाव ,तांदुळवाडी ,धनकवाडी आदि भागात दहशद घालणार्या बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. धनकवाडी येथील रावसाहेब अनाजी पवार यांच्या शेतातील कांदा चाळीत दगा धरून बसलेल्या बिबट्यास नाशिकच्या टेस्को पथकाच्या सहाय्याने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले .
धनकवडी येथील काही नागरिकांना बिबट्या दिसला असता नागरिकांनी त्याला पळवून लावण्यासाठी जाळ, तसेच दगड मारून पळवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने रावसाहेब अनाजी पवार यांच्या शेतातील कांदा चाळीत आश्रय घेतला. तोपर्यंत धनकवाडीत बिबट्या आल्याची वार्ता पसरल्याने बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत येथील बाबासाहेब शिंदे व ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्याने वनविभागाचे कर्मचारी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या गुरांच्या गोठ्याजवळील कांदा चाळीत अडचणीच्या ठिकाणी दडुन बसल्याचे बघितल्यावर तो सहजासहजी पिंजर्यात कैद होणार नाही याचा अंदाज आल्यावर वनविभागाने नाशिक येथील टेस्को टीमला पाचारण केले. टीम धनकवाडीत दाखल झाल्यावर वन विभागाने कर्मचार्यांचे दोन पथके तयार करून चाळीतील बिबट्याचा अंदाज घेऊन बिबट्या पळून जाणार नाही अशी साविधगरी बाळगून इंजेक्शनच्या सहाय्याने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या चाळीत अडचणीच्या ठिकाणी असल्याने पथकाला बिबट्यास इंजेक्शन मारण्यास अडचण येत होती. मात्र पथकाने प्रयत्न केल्याने सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नाने बिबट्यास बेशुद्ध करण्यात यश आले.