Nashik Bus Accident: अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 08:36 AM2022-10-08T08:36:32+5:302022-10-08T08:37:08+5:30

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला.

Nashik Bus Accident: 5 lakh each to the next of kin of those killed in the accident; Announcement of CM Eknath Shinde | Nashik Bus Accident: अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Nashik Bus Accident: अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

googlenewsNext

नाशिक - औरंगाबाद रोडवरील भीषण अपघातात होरपळून जीव गेलेल्या १० प्रवाशांच्या वारसांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही घटनास्थळी पोहचून आढावा घेतला. टँकर आणि बस या धडकेत बसला भीषण आग लागली. त्यात १० प्रवाशांचा जीव गेला तर २१ जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती तर नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या टँकरमध्ये धडक झाली. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार आहेत अशी माहितीही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.



 

कसा झाला अपघात?
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने जवळपास १० प्रवासी होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जळून खाक झाले. सदर अपघातानंतर बस ५० ते ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ७० ते ८० मीटर पुढे जाऊन  टॅंकर रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली तसेच पोलिसांना देखील कळविले मात्र पोलीस वेळेच घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ३८ प्रवासी बसमध्ये होते. त्यापैकी १० प्रवशी होरपळून ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. १० मृत झाले असून सर्व पुरुष असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामध्ये एक मृतकाची कवटी फक्त आढळून आली. ती लहान मुलाची असू शकते असे पोलिसांनी सांगितले.

दैव बलवत्तर म्हणून बचावलो
पहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेला असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो - अनिता चौधरी, (रा. लोणी, जि.वाशीम)

Web Title: Nashik Bus Accident: 5 lakh each to the next of kin of those killed in the accident; Announcement of CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.