नाशिक - सप्तश्रुंगी गडावर अवजड वाहनाना बंदी
By admin | Published: September 16, 2016 10:52 AM2016-09-16T10:52:43+5:302016-09-16T12:56:04+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तश्रुंगीच्या घाटात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटात ठिकठिकाणी मोठया प्रमाणात 200 फूट दरड कोसळल्या आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
सप्तश्रुंगी गड (नाशिक), दि. 16 - महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तश्रुंगीच्या घाटात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटात ठिकठिकाणी मोठया प्रमाणात 200 फूट दरड कोसळल्या आहेत. गडावर जाताना घ्याव्या लागणा-या वळणावरील रस्ताच वाहुन गेला आहे. प्रशासनाने एस टी बसेससह अवजड वाहनांना गडावर जाण्यास मनाई केली आहे. गडावरील घाटात गेल्या काही दिवसांपासून छोटी मोठी दरड पडत असते. पण राञीपासून पडणा-या मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेलेला असताना वाहने चालवणे धोकादायक झाले आहे. एक ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु होणार असून रस्त्याचे काम त्वरीत करावे अशी मागणी राज्यभरातून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबरोबरच स्थानिक नागरिकांनी केली आहे.