राज्यात नाशिक सर्वाधिक थंड
By admin | Published: November 2, 2016 09:20 PM2016-11-02T21:20:01+5:302016-11-02T21:20:01+5:30
राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिक अधिक थंड झाले आहे. बुधवारी (दि.२) नाशिकचे किमान तपमान १०.५ अंश इतके नोंदविले गेले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 02 - राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिक अधिक थंड झाले आहे. बुधवारी (दि.२) नाशिकचे किमान तपमान १०.५ अंश इतके नोंदविले गेले.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात थंडीने दमदार आगमन केले आहे. मंगळवारी (दि.१) नाशिकचे किमान तपमान १३.७ अंशावर होते; मात्र एका दिवसात पारा अचानकपणे घसरुन थेट तीन अंशांनी कमी झाल्याने बुधवारी सकाळी किमान तपमान १०.५ इतके असल्याची नोंद हवामान खात्याने केली. यामुळे राज्यातील नाशिक हे सध्या सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण बनले आहे. नाशिकचा पारा सातत्याने घसरु लागल्याने यावर्षी नाशिककरांना हुडहुडी भरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.