नाशिक : तलावात बुडून दोघांचा मृत्यू
By Admin | Published: September 3, 2016 11:13 AM2016-09-03T11:13:58+5:302016-09-03T11:21:02+5:30
नाशिकजवळील पंचवटी भागातील म्हसरूळ येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, ३ - नाशिकजवळील पंचवटी भागातील म्हसरूळ येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर इतर तिघांना वाचवण्यात यश आले. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व ओमकार कुलकर्णी (16) व रोहित अनिल कोलते (17) अशी दोन मृत तरूणांची नावे आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी सागर निकम, ओम पाटील, उदय कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी, कुमार कोलते असे पाच ते सहा मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात उडया घेतल्यानंतर पाण्याचा व चिखलाचा अंदाज.न आल्याने अथर्व कुलकर्णी, व कुमार कोलते या दोघांचा पाण्याचा बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण म्हसरूळ येथील कलानगर भागातील रहिवाशी आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पाण्यात बुडून सहाहून आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.