नाशिकला कारखान्यात आढळला बिबट्या !

By admin | Published: February 20, 2016 03:07 AM2016-02-20T03:07:40+5:302016-02-20T03:07:40+5:30

येथील अंबड औद्यागिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कारखान्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले.

Nashik found in the factory leopard! | नाशिकला कारखान्यात आढळला बिबट्या !

नाशिकला कारखान्यात आढळला बिबट्या !

Next

नाशिक : येथील अंबड औद्यागिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कारखान्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने बिबट्याच्या बछड्यास जेरबंद केले.
कंपनीच्या जीआयएस शॉपमध्ये सकाळी ९ वाजेच्या सुमारास २० ते २५ कामगार आल्यानंतर एकास बिबट्याचा बछडा बसलेला दिसला. त्याने कामगारांना त्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व कामगार तेथून बाहेर पडले.
कंपनी व्यवस्थापनाने तातडीने वनविभाग तसेच अंबड पोलिसांना कळवून बिबट्या असलेल्या शॉपचे दोन्ही बाजूंकडील शटर बंद केले. बिबट्याचे बछडे हे कंपनीच्या अत्यंत अडगळीच्या जागेवर लपलेले असल्याने त्यास पकडणे वनविभागाला अवघड झाले होते. ट्रॅन्क्यिलायझर गनच्या साहाय्याने दुसऱ्या प्रयत्नात बछडा बेशुद्ध झाला. हा बछडा ७ ते ८ महिन्यांचा आहे, असे वनविभागाने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik found in the factory leopard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.