छुप्या पाणीकपातीने नाशिककर संतप्त

By admin | Published: February 11, 2016 01:43 AM2016-02-11T01:43:54+5:302016-02-11T01:43:54+5:30

शहराला वाढीव पाणीकपातीची गरज नसून ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गंगापूर धरणसमूहात उपलब्ध असल्याचा दावा एकीकडे पालकमंत्री गिरीश महाजन वारंवार करीत

Nashik gets angry with the water | छुप्या पाणीकपातीने नाशिककर संतप्त

छुप्या पाणीकपातीने नाशिककर संतप्त

Next

नाशिक : शहराला वाढीव पाणीकपातीची गरज नसून ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गंगापूर धरणसमूहात उपलब्ध असल्याचा दावा एकीकडे पालकमंत्री गिरीश महाजन वारंवार करीत
असताना महापालिकेने मात्र नियमित १५ टक्के पाणी कपातीव्यतिरिक्त सुमारे १० टक्के वाढीव पाणीकपात छुप्या पद्धतीने लागू केल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिकला पाण्याची कमतरता असताना प्रशासनाच्या छुप्या पाणीकपातीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापौर, उपमहापौरांसह गटनेत्यांनीच आकडेवारीनिशी छुप्या पाणीकपातीचा भांडाफोड करत प्रशासनावर रोष व्यक्त केला
आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही पाणीकपात सुरू
केल्याची कबुली दिल्यानंतर महापौरांनी वाढीव पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे व पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणेच नियमित १५ टक्के पाणीकपात सुरू ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik gets angry with the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.