नाशिक मर्चंट बँकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ! सभासदांनी विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 02:35 PM2017-09-07T14:35:06+5:302017-09-07T14:41:29+5:30

नाशिक, दि. 7 - जिल्ह्यातील सर्वात मोठी स्थानिक नागरी बँक असलेल्या दि नाशिक मर्चंट को ऑप बँकेच्या वार्षिक सर्व ...

In the Nashik Merchant Bank meeting | नाशिक मर्चंट बँकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ! सभासदांनी विचारला जाब

नाशिक मर्चंट बँकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ! सभासदांनी विचारला जाब

Next

नाशिक, दि. 7 - जिल्ह्यातील सर्वात मोठी स्थानिक नागरी बँक असलेल्या दि नाशिक मर्चंट को ऑप बँकेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला आज दुपारी सदरची सभा प्रशासक भोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी बँकेचा प्रशासकीय राजवटीत एनपीए वाढून 19 टक्के इतका झाला असून व्याज दर अधिक असल्याने ग्राहक अन्य बँकांकडे वळत आहेत असा आरोप करीत सभासदांनी जाब विचारला.  
त्यावर प्रशसकांनी आरोप मान्य करीत व्याज दरात सुधारणा केल्याचे सांगितले महत्वाचे म्हणजे बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा गेल्या वार्षिक सभेत ठराव होऊनही त्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे इतिवृत्त न पाठविण्यात आल्याने सभासद आणि माजी संचालकांनी गोंधळ घेतला यावर प्रशासक भोरिया यांना माफी मागावी लागली.
नाशिक मर्चंट बँक हि मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक असून जिल्हाभरात  दीड लाख सभासद आहेत राजकीय दृष्ट्या ही बँक महत्वाची मानली जाते.

{{{{dailymotion_video_id####x845atu}}}}

Web Title: In the Nashik Merchant Bank meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.