Nashik: नाशिकमध्ये मनसेने कर्नाटकच्या बसला काळे फासले

By संजय पाठक | Updated: February 22, 2025 19:37 IST2025-02-22T19:36:27+5:302025-02-22T19:37:25+5:30

Nashik News: बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक या संघटनेने महाराष्ट्रातील एसटीचे महाराष्ट्रीयन चालकांना वाहकांना तोंडाला काळे फासून मराठी भाषेचा निषेध केला आहे त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक येथे त्यांच्या कर्नाटक परीवहनच्या बसेसला काळे फासले.

Nashik: MNS blackouts Karnataka buses in Nashik | Nashik: नाशिकमध्ये मनसेने कर्नाटकच्या बसला काळे फासले

Nashik: नाशिकमध्ये मनसेने कर्नाटकच्या बसला काळे फासले

- संजय पाठक
नाशिक -  बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक या संघटनेने महाराष्ट्रातील एसटीचे महाराष्ट्रीयन चालकांना वाहकांना तोंडाला काळे फासून मराठी भाषेचा निषेध केला आहे त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक येथे त्यांच्या कर्नाटक परीवहनच्या बसेसला काळे फासले तसेच बसेसवर ‘जय महाराष्ट्र, मनसे नासिक’ असो लिहून इशारा देण्यात आला. तसेच यातील वाहक मराठी असल्याने त्यांचा सन्मान करून त्यांना  परत पाठवण्यात आले आहे.

मनसेच्या वतीने यापूर्वीही अशाच प्रकारे कर्नाटकाने महाराष्ट्रातील मराठी भाषिकांवर अन्याय केल्यावर आंदोलन करण्यात आले हेाते. आताही ठक्कर बाजार बस स्थानक येथे आंदेालन करण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे ,जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे उपशहराध्यक्ष मिलिंद कांबळे, राकेश परदेशी ,अमित गांगुर्डे, शहर सचिव नितीन आहेरराव, वाहतूक सेना चिटणीस जनार्दन खाडे, सचिव बबलू ठाकूर यांनी कर्नाटकचा निषेध करून बसला काळे फासले आणि कन्नड सरकारचा निषेध करून यापुढेही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा दिला आहे. 

Web Title: Nashik: MNS blackouts Karnataka buses in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.