नाशिकमध्ये मनसेला गळती सुरूच

By admin | Published: October 19, 2016 05:45 AM2016-10-19T05:45:16+5:302016-10-19T05:45:16+5:30

नगरसेवक शशिकांत जाधव यांनी कमळ हाती धरले, तर माजी गटनेता, नगरसेवक अशोक सातभाई हे आणखी एका नगरसेवकासह शिवबंधनात अडकले

In Nashik, the MNS continues to leak | नाशिकमध्ये मनसेला गळती सुरूच

नाशिकमध्ये मनसेला गळती सुरूच

Next


नाशिक : महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेला लागलेली गळती कायम असून, जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शशिकांत जाधव यांनी कमळ हाती धरले, तर माजी गटनेता, नगरसेवक अशोक सातभाई हे आणखी एका नगरसेवकासह शिवबंधनात अडकले आहेत.
त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसला असून, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सपत्नीक शिवसेनेत तर रूपाली गावंड यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकाजवळ येऊ लागल्याने पक्षांतराला वेग आला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी मुंबई येथे मनसेचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.
त्यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नगरसेवक लता पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. पाटील यांचे पती नगरसेवक दिनकर पाटील यांनी अगोदरच भाजपात प्रवेश केला असल्याने त्यांचा प्रवेश अपेक्षित मानला जात होता, तर महापौरपदाच्या निवडणुकीत दोनदा डावलले गेल्याने नाराज असलेले शशिकांत जाधव यांचादेखील पक्ष बदल अपेक्षित मानला जात होता.
शिवसेनेच्या दिवंगत नगरसेविक साधना जाधव यांचे पती मधुकर जाधव यांनीही भाजपात प्रवेश केला. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल तसेच विजय साने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शशिकांत जाधव यांच्याप्रमाणेच मनसेत गटबाजीमुळे नाराज असलेले माजी गटनेता - नगरसेवक अशोक सातभाई यांनी आणि फुलेनगर परिसराचे नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी संपर्कप्रमुख अजय चौधरी, माजी
मंत्री बबन घोलप, आ. योगेश
घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहरप्रमुख अजय बोरस्ते, माजी
जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड,
माजी महापौर यतिन वाघ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: In Nashik, the MNS continues to leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.