नाशिकमध्ये 40 ते 45 शेतक-यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By Admin | Published: June 2, 2017 11:58 AM2017-06-02T11:58:59+5:302017-06-02T12:04:56+5:30

ऑनलाइन लोकमत येवला (नाशिक), दि. 2 - राज्यभरात शेतकरी संपाचे तीव्र पडसाद उमटत असून नाशिकमध्ये संपात सहभागी झालेल्या 40 ...

In Nashik, police arrested 40 to 45 farmers | नाशिकमध्ये 40 ते 45 शेतक-यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नाशिकमध्ये 40 ते 45 शेतक-यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next
ऑनलाइन लोकमत
येवला (नाशिक), दि. 2 - राज्यभरात शेतकरी संपाचे तीव्र पडसाद उमटत असून नाशिकमध्ये संपात सहभागी झालेल्या 40 ते 45 शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. येवला कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोल नाका येथे काल झालेल्या शेतकरी संपात वाहने अडवून नुकसान केल्याप्रकरणी आज पोलिसांनी या शेतक-यांना ताब्यात घेतले  आहे. 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून इतरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येवला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
 
अण्णा हजारेंची चर्चेची तयारी - 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच शेतक-यांच्या बाजूने  आपण सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचंही ते बोलले आहेत. आपण मध्यस्थी करण्यास तयार असून सरकारने सहानुभूतीपुर्वक विचार करणं आवश्यक आहे. सहनशक्ती संपल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरतो. आंदोलनकर्त्यांनी शांततेने आंदोलन करणं गरजेचं आहे असं अण्णा हजारे बोलले आहेत. 
 
(VIDEO - दूध टंचाई, भाज्या महागणार, वाशी मार्केटमध्ये आल्या फक्त 180 गाडया)
(दुस-या दिवशीही राज्यभरात शेतमालाची नासाडी ( फोटो स्टोरी))
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे.मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साताबारा कोरा करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
https://www.dailymotion.com/video/x8450j7

 
शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत तर, कुठे भाजीपाला रस्त्यावर फेकला जात आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईसह अन्य शहरांना या संपाची विशेष झळ जाणवली नव्हती. पण आज मात्र दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडयांची आवक घटली आहे. दररोज 500 ट्रक भरुन फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात पण आज फक्त 180 गाडया आल्या. यात 49 ट्रक आणि 131 टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही.
 
दादरमध्ये रोज 200 गाडया भरून भाजीपाला येतो पण आज फक्त 50 ते 60 गाडयांमधून भाजीपाला आला.  वसई-विरारमध्ये दुधाची आवक 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. लातूर बाजार समितीतही फक्त 40 टक्के भाज्यांची आवक झाली आहे. सोलापूरमध्ये पोलीस बंदोबस्त असून देखील पंढरपूर मार्केटमध्ये शुकशुकाट, एक ही शेतकरी भाजीपाला घेऊन आला नाही.
 

Web Title: In Nashik, police arrested 40 to 45 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.