नाशिकमध्ये जावयाकडून सासूसह बालकाची हत्या

By admin | Published: July 13, 2017 04:31 PM2017-07-13T16:31:43+5:302017-07-13T16:56:17+5:30

शहरामधील मखमलाबाद शिवारातील गंधारवाडी वस्तीमध्ये राहणाऱ्या खराटे कुटुंबाच्या जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षीय बालकाची भरदिवसा...

In Nashik, Sawasih was murdered by Jawya | नाशिकमध्ये जावयाकडून सासूसह बालकाची हत्या

नाशिकमध्ये जावयाकडून सासूसह बालकाची हत्या

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 13 : शहरामधील मखमलाबाद शिवारातील गंधारवाडी वस्तीमध्ये राहणाºया खराटे कु टुंबाच्या जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षीय बालकाची भरदिवसा कोयत्याने निर्घृण हत्त्या केल्याची हृदयद्रावक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंधारवाडी परिसरात राहणारे दशरथ सोनू खराटे यांच्या कुटुंबातील जावई संशयित मोतीराम बदादे याने राहत्या घरामधून सासू आणि मेव्हणीच्या आठ वर्षीय मुलाला दुचाकीवर घेऊन आला.

रामवाडी परिसराकडे जाणाºया मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या जंगलात दोघांना काही तरी आमिष दाखवून नेले आणि त्यांचा धारधार शस्त्राने निर्घृण खून केला. या हल्ल्यात मंदाबाई दशरथ खराटे (५५) नैतिक विशाल लिलके (८) त्यानंर मोतीराम याने दुचाकीवरून पुन्हा सासूचे घर गाठले आणि सासरे दशरथ सोनू खराटे यांना सासूची लूटमार होत असल्याचे खोटे सांगून दुचाकीवर बसवून आणले.

घटनास्थळावर आल्यानंतर त्यांना उतरवून लूटमार करणाºयांनी सासूला जंगलात नेल्याचे खोटे सांगितले आणि त्यांनाही जंगलात घेऊन गेला. त्यांच्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढविला. त्यांनी काही वार चुकविले; मात्र डाव्या हातासह डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जखमी अवस्थेत जीव मुठीत घेऊन जवळच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या दिशेने पळाले. पोलीस ठाण्यात जखमी अवस्थेत पोहचल्यानंतर पोलिसांना सर्व प्रकार कथन केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसेच पंचवटी पोलिसांनाही खबर दिली. जावई बदादे हा घटनास्थळावरुन फरार झाला आहे. हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.

Web Title: In Nashik, Sawasih was murdered by Jawya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.