शिर्डीतील दुहेरी खून खटल्याचा आज निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:12 AM2018-05-03T00:12:37+5:302018-05-03T00:15:42+5:30
नाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़ विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा गुरुवारी (दि़३) या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता असून या गुन्ह्यामध्ये शिर्डीतील कुख्यात गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (३२) याच्यासह त्याच्या टोळीतील 24 गुंडाचा संशयितांमध्ये समावेश असून त्यांच्यावर मोक्कान्वये गुन्हा दाखल आहे.
नाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़ विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा गुरुवारी (दि़३) या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता असून या गुन्ह्यामध्ये शिर्डीतील कुख्यात गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (३२) याच्यासह त्याच्या टोळीतील 24 गुंडाचा संशयितांमध्ये समावेश असून त्यांच्यावर मोक्कान्वये गुन्हा दाखल आहे.
१४ व १५ जून २०११ रोजी रात्रीच्या सुमारास संशयितांनी विलास पंढरीनाथ गोंदकर (४७, रा़ बिरेगाव रोड, शिर्डी, अहमदनगर) यांचा मुलगा प्रविण व त्याचा मित्र रचित पटणी या दोघांना खंडणीच्या रकमेच्या मागणीकरीता व तडजोड करण्यासाठी सुरभी हॉटेलमध्ये बोलावून घेतले़ यानंतर या दोघांचे स्कॉर्पिओ वाहनातून अपहरण करून अज्ञात स्थळी व तेथून निमगाव येथील वाल्मिक पावलस जगताप यांच्या शेतात नेवून रात्रभर मारहाण करून अत्याचार केले़ संशयितांनी गोंदकर व पटणी यांना अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडून त्यांचे फोटोही काढले़ या मारहाणीमुळे गोंदकर व पटणी या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची नग्नावस्थेतील मृतदेह शिर्डीतील हॉटेल पुष्पांजलीसमोर नेऊन टाकली़ या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात पाप्या शेखसह त्यांच्या साथीदारांविरोधात खंडणी, खून, अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़
तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून २४ पैकी २३ संशयितांना अटक केली़ यामध्ये पाप्या शेख (२८, राक़ालिकानगर, शिर्डी, अहमदनगर) याचा प्रमुख सहभाग असल्याचे समोर आले़ पाप्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर विविध प्रकारचे २२ गुन्हे दाखल असल्याने या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली़ शिर्डीतील पाप्याची दहशत पाहाता हा खटला नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात चालविण्यात आला़ यासाठी सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून अॅड उज्वल निकम व अॅड अजय मिसर यांची नियुक्ती केली़ यामध्ये निकम यांनी दोन तर मिसर यांनी ४३ साक्षीदार तपासले़ या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायाधीश शर्मा हे गुरुवारी (दि.३) निकाल देण्याची शक्यता आहे.
साक्षीदारांनापोलीससंरक्षण
कुख्यात पाप्या शेखसह टोळीवर २२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ दहशतीमुळे साक्षीदार संशयितांविरोधात साक्ष देण्यास धजावत नव्हते त्यामुळे काही साक्षीदारांना पोलीस संरक्षण तर काही काही साक्षीदारांच्या साक्ष ही संशयितादरम्यान पडदा ठेवून नोंदविण्यात आल्या़ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खटलयाचे कामकाम दैनंदिन स्वरुपात सुरू होते़
खटल्यातपरिस्थतीजन्यपुरावेमहत्वाचे
या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी पोलिसांनी सबळ परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत़ या पुराव्यांच्या आधारेच सरकारी वकीलांना आरोप सिद्ध करावे लागत होते़ या खटल्यात संशयितांकडून जप्त केलेले मोबाईल, त्यातील क्लिप्स, संभाषण, प्रवीण आणि रचीतचे फोटो, संशयितांचे कॉल रेकॉर्ड, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत़ याबरोबरच संशयित तसेच मयत दोन्ही युवकांच्या अखेरच्या हालचालींची कडी जुळवण्यासोबत सर्व घटनाक्रमांची सांगड घालण्यात आली.
दुहेरीखूनातीलसंशयितांचीनावे
पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (३२), विनोद सुभाष जाधव (३१), सागर मोतीराम शिंदे (१९), सुनील ज्ञानदेव लहारे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे (२६), माऊली उर्फ ज्ञानेश्वर शिवनाथ्लृ गुंजाळ (२२), गनी मेहबुब सैयद (३०), चिंग्या उर्फ समीर निजाम पठाण, रहीम मुनावर पठाण (२३), सागर शिवाजी काळे (२०), राजेंद्र किसन गुंजाळ (३३), इरफान अब्दुल गनी पठाण (२०), निलेश देवीलाल चिकसे (१९), मुबारक उर्फ लड्ड्या ख्वाजा शेख (३२), वाल्मिक पावलस जगताप (४२), निसार कादीर शेख (२४), दत्तात्रय बाबुराव कर्पे (३५), भरत पांडुरंग कुरणकर (४९), बिसमिल्ला मर्द पाप्या उर्फ सलीम शेख (२५), संदीप शामराव काकडे (२४), हिराबाई शामराव काकडे (४९), मुन्ना गफुर शेख (२४), राजु शिवाजी काळे (२१), प्रकाश सुरेश अवसरकर (२२). या सर्व संशयितांविरोधात अपहरण, खंडणी, खुनासह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.