नाशिक - कांदा भाववाढीसाठी शेतक-यांचा रास्ता रोको
By Admin | Published: June 6, 2016 12:41 PM2016-06-06T12:41:03+5:302016-06-06T12:53:59+5:30
कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याने निफाड तालुक्यातील बसवंत येथे आंदोलन करण्यात आले
>ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. 06 - कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याने निफाड तालुक्यातील बसवंत येथे आंदोलन करण्यात आले. विधानसभा विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान रास्ता रोकोदेखील करण्यात आला. सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या आंदोलनामुळे मुंबई - आग्रा महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी आणि कांदा उत्पादकांना २ हजार रुपये हमी भाव द्यावा यासाठी हे इशारा आंदोलन करण्यात येत आहे. यानंतरच्या कालावधीत मंत्रालय आणी मंत्र्यांवर कांदे फेकण्यात येतील असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.