नाशिक- फी न भरल्याने विद्यार्थ्यांना डांबले
By admin | Published: December 2, 2014 04:17 PM2014-12-02T16:17:15+5:302014-12-02T16:17:27+5:30
वेळेवर फी भरली नाही नाही म्हणून २० ते २५ विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांना डांबून ठेवण्यात आल्याची घटना नाशिकमधील सेंट फ्रान्सिस शाळेत घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २ - वेळेवर फी भरली नाही नाही म्हणून २० ते २५ विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांना डांबून ठेवण्यात आल्याची घटना नाशिकमधील सेंट फ्रान्सिस शाळेत घडली आहे. गेल्या अनेक महिन्यापांसून शाळेतील फी वाढीविरोधात पालक आंदोलन करत आहेत. जोपर्यंत ही वाढ कमी केली जात नाही तोपर्यंत फी भरणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला होता. तर शाळेनेही पालकांच्या मागण्या मान्य न करता आपल्याच भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.
मात्र काही दिवसांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना शाळा सुटल्यावर घरी जाऊ न देता शाळेतच डांबून ठेवण्यात आले. फी भरा आणि मुलांना घेऊन जा असा फोनही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना करण्यात आला. अखेर याप्रकरणी आज शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.