मनपा निवडणूक काळात नाशिक ‘भयमुक्त’ राहणार; पोलिस आयुक्तांची ग्वाही

By admin | Published: January 19, 2017 05:17 PM2017-01-19T17:17:43+5:302017-01-19T17:17:56+5:30

आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणूकीच्या धामधुमीत नाशिक ‘भयमुक्त’ असेल. निवडणूक काळात कायदासुव्यवस्था बिघडवणा-यांची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे.

Nashik will remain 'fearless' during the election period; Police Commissioner's Guarantee | मनपा निवडणूक काळात नाशिक ‘भयमुक्त’ राहणार; पोलिस आयुक्तांची ग्वाही

मनपा निवडणूक काळात नाशिक ‘भयमुक्त’ राहणार; पोलिस आयुक्तांची ग्वाही

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 19 - आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणूकीच्या धामधुमीत नाशिक  ‘भयमुक्त’ असेल. निवडणूक काळात कायदासुव्यवस्था बिघडवणा-यांची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा संशयित सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम आखण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी वार्षिक गुन्हेगारी नियंत्रण आढावा बैठकीत बोलताना दिली.
 
नाशिककरांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे दडपण बाळगण्याची गरज नाही. लोकशाहीचा हक्क निसंकोचपणे बजवावा. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.  गुन्हेगार हा केवळ गुन्हेगारच असतो, त्याचा कुठलाही राजकिय पक्ष नाही किंवा जात -धर्म नाही असे सिंगल यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
 
२०१६ सालातल्या गुन्हेगारी घटनांचा लेखाजोखा यावेळी पोलीस प्रशासनाकडून सादर करण्यात आला. याप्रसंगी उपआयुक्त दत्ता कराळे (गुन्हे), विजय पाटील (प्रशासन), श्रीकांत धीवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ  यांच्यासह सर्व प्रमुख पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उपस्थित होते. कराळे यांनी गुन्हेगारी घटना व त्यांचा तपास न्यायालयात शाबीत गुन्हे आणि आरोपींना झालेली शिक्षा याविषयीची एकूण माहिती दिली. खून, प्राणघातक हल्ले, दरोडे यांसारखे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून पोलिसांनी सांगण्याचा प्रयत्न केला. शहरात सोनसाखळी चोरी, वाहनचोरी, आर्थिक फसवणूक सारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले. त्याचप्रमाणे बेशिस्त वाहतुकीचा प्रश्नाकडेही सर्व उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले.
 
पोलीस मदत, अग्निशामक, रुग्णवाहिका, आपत्कालिन मदत या सर्व सेवांसाठी संयुक्तरित्या लवकरच ११२ टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय मंजुरी देखील मिळाल्याची माहिती कराळे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे शहरातील अकरा अपघाती ठिकाणांवर नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून त्यासही मंजुरी मिळाली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘सायबर क्लब’ स्थापन करण्यात आले असून सातत्याने सायबर सुरक्षाविषयी शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. पुढच्या टप्प्यात कार्पोरेट कार्यालये, कारखाने, रहिवाशी क्षेत्र, झोपडपट्टी भागात सायबर सुरक्षा व जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Nashik will remain 'fearless' during the election period; Police Commissioner's Guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.