नाशिक जिल्हा परिषदेत युतीसाठी सेनेला पर्याय खुले

By admin | Published: February 25, 2017 04:43 AM2017-02-25T04:43:14+5:302017-02-25T04:43:14+5:30

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २५ जागा मिळवून अध्यक्ष पदावर दावा सांगितला असून, सेनेसाठी सर्व पर्याय खुले आहेत

In the Nashik Zilla Parishad open the options for the alliance | नाशिक जिल्हा परिषदेत युतीसाठी सेनेला पर्याय खुले

नाशिक जिल्हा परिषदेत युतीसाठी सेनेला पर्याय खुले

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २५ जागा मिळवून अध्यक्ष पदावर दावा सांगितला असून, सेनेसाठी सर्व पर्याय खुले आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सिन्नर तालुक्यातील चार, तर येवला तालुक्यातील तिघा महिला सदस्य स्पर्धेत आहेत.
जिल्हा परिषदेत भाजपाने शिवसेनेसोबत युतीची तयारी दर्शविली असली तरी शिवसेनेकडून युतीचा निर्णय मुंबईहून होण्याची शक्यता आहे. तूर्तास शिवसेनेने युतीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष यांचे पर्याय ठेवले आहेत. भाजपासोबत युतीचा निर्णय झालाच, तर शिवसेना भाजपाकडे बहुमतापेक्षा तीन जागा जास्त असतील. त्या परिस्थितीत अध्यक्ष शिवसेनेचा तर उपाध्यक्ष भाजपाचा हा सरळ सरळ फॉर्म्युला शिवसेनेकडून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: In the Nashik Zilla Parishad open the options for the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.