अहमदनगरच्या चन्या बेग टोळीतील शार्पशूटर शाहरूख शेखसह दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:03 PM2017-10-22T16:03:53+5:302017-10-22T16:54:41+5:30

नाशिक : अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरूख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलीसांनी रविवारी (दि़२२) पहाटे सापळा रचत पाथर्डी फाटा परिसरातून जेरबंद केले़

 nashik,Ahmadnagar, Sharpshooter,Shahrukh,Sheikh,arrest | अहमदनगरच्या चन्या बेग टोळीतील शार्पशूटर शाहरूख शेखसह दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगरच्या चन्या बेग टोळीतील शार्पशूटर शाहरूख शेखसह दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

googlenewsNext

नाशिक : अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरूख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलीसांनी रविवारी (दि़२२) पहाटे सापळा रचत पाथर्डी फाटा परिसरातून जेरबंद केले़ या तिघांकडून दोन विदेशी बनावटीची पिस्तूल, ४० जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे़ शहरात मोठे कांड करण्याचा कट या तिघांनी रचला होता मात्र त्यांना वेळीच जेरबंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे़ दरम्यान, पाथर्डी फाटा परिसरात अतिरेकी पकडल्याचा संदेश सोशल मीडीयावरून व्हायरल झाल्यानंतर अतिरेकी नसून सराईत गुन्हेगार असल्याचा खुलासा पोलिसांनी केला़

पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवनच्या पाठीमागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील तसेच मोक्कातील सराईत गुन्हेगार शाहरुख रज्जाक शेख (२५, रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) व सागर सोना पगारे (२२, रा. चितळी, तालुका राहता, जि. नगर) हे दोघेजण असल्याची माहिती अहमदनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्याशी चर्चा केल्यानंतर रविवारी (दि़२२) पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास नाशिक शहर पोलीस व कमांडो यांनी इमारतीला वेढा घातला़

सराईत गुन्हेगार हे पार्वती अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावरील रमेश सावंत यांच्या फ्लॅट नंबर १३ मध्ये राहत असल्याचे समोर येताच काही पोलिसांनी इमातीच्या जिन्यातून तर काही जणांनी शिडीचा वापर करून फ्लॅटच्या गॅलरीत प्रवेश केला़ पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करताच सराईत गुन्हेगार शाहरुख शेख व बारकु सुदाम अंभोरे (२१, रा. चितळी ता. राहता, जि. अहमदनगर ) या दोघांना झडप घालून जेरबंद केले़ यानंतर बेडरूममध्ये असलेल्या सागर पगारे यास पकडण्यासाठी दरवाजा तोडला असता पगारेने पोलिसांवर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पुर्वीच कमांडो पथकाने जीवाची पर्वा न करता झडप टाकून त्यास ताब्यात घेतले़

पाथर्डी फाटा परिसरातील पार्वती अपार्टमेंटमध्ये पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पोलिसांची ही मोहिम सुरु होती. या मोहिमेमुळे पाथर्डी परिसरात अतिरेकी पकडल्याचे सोशल मीडीयावरून व्हायरल झाले होते़ यामुळे स्थानिकांसह नागरिकांनी पार्वती अपार्टमेंटसमोर गर्दी केल्याने पोलीसांना बदोबस्तात वाढ करावी लागली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल, उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़

दरम्यान, हे सराईत गुन्हेगार शहरात कोणत्या उद्देशाने राहत होते, त्यांनी घरफोड्या वा गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे़ ऐन दिवाळीत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़


विदेशी पिस्टलसह काडतुसे जप्त


गत वर्षभरापासून अहमदनगर पोलीस कुख्यात गुन्हेगार शेख व त्याच्या साथीदारांच्या मागावर होते़ त्यानुसार शेखसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन विदेशी पिस्टल, ४० काडतुसे, चार मोबाईल व पासिंग न झालेली दुचाकी जप्त केली आहे़ (फोटो / आर / फोटो / २२ नगर शेख अरेस्ट १ या नावाने सेव्ह केला आहे़)


न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी
अहमदनगर पोलिसांनी अटक केलेल्या शेखला न्यायालयात हजर करण्यासाठी नेले असता चहा पिण्याच्या बहाणा करीत पोलिसांच्या हातावर तुरी देत तो फरार झाला़ या प्रकरणानंतर तीन पोलीस कर्मचाºयांना निलंबितही करण्यात आले़ यामुळे शेख पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते़ नाशिक व नगर पोलिसांनी संयुक्तपणे शेखच्या मुसक्या आवळल्या़


फ्लॅटमालकावर होणार गुन्हा दाखल


दहशतवाद विरोधी पथकाने काही वर्षांपुर्वी सातपूर परिसरातील दहशतवादी बिलाल यास अटक केली होती़ त्यानंतर घरमालकांना घर भाडेतत्वावर देतांना त्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक केले़ मात्र, या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे समोर आल्यानंतर अनेक घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते़ अहमदनगरच्या या तिघांना घर भाडेतत्वावर देणारे रमेश सावंत यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती का याची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे माहिती पोलीस अधिकाºयांनी दिली आहे़

Web Title:  nashik,Ahmadnagar, Sharpshooter,Shahrukh,Sheikh,arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.