नाशिकचा किसन तडवी, ताई बामणेला अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 09:17 PM2017-11-20T21:17:35+5:302017-11-20T21:25:58+5:30
नाशिक : विजयवाडा येथे सुरू असलेल्या ज्युनिअर नॅशनल अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी आणि ताई बामणे यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावून महाराष्टच्या खात्यात आणखी पदकांची भर घातली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णजिंकून किसनने महाराष्टच्या पदकाचे खाते उघडले होते. किसनने या स्पर्धेत वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकाविले आहे.

विजयवाडा येथे सुरू असलेल्या राष्टय पातळीवरील ज्युनिअर अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाराष्टच्या चमूत नाशिकच्या सहा खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे महाराष्टला आणखी काही पदके मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी किसन तडवीने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्टला सुवर्णपदक मिळवून देत पदकांचे खाते उघडले होते. या स्पर्धेत त्याने दावेदार असलेल्या उत्तरप्रदेशच्या खेळाडूंना मागे टाकत विजय मिळविला होता. तर ताई बामणे देखील फार्मात असल्याने आपल्या गटात तीही पदक मिळवून देईल असा विश्वास तिचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार ताईने देखील सुवर्ण कामगिरी केली.
१०,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किसनने ३०:४१:५७ वेळेची नोंद करीत सुवर्णपदक मिळविले. त्याने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या खेळाडूंना मागे टाकत मोठ्या फरकाने सुवर्णपदक पटाकाविले
तर ८०० मीटरमध्ये ताई बामणे हिने २:१३:६२ मिनिटांची नोंद करीत सुवर्णपदक पटकाविले. ताई देखील केरळच्या धावपटूंशी स्पर्धा करीत सहज सुवर्णपदकावर नाव कोरले. या दोघांच्या कामगिरीमुळे महाराष्टच्या पदतालिकेत पदकांची भर पडली आहे.